Kanda Bajar Bhav : गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या दरात (Onion Price) सुधारणा होत असल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे. खरं पाहता सप्टेंबर महिन्यापर्यंत कांद्याला अपेक्षित असा बाजार भाव (Onion Rate) मिळत नव्हता. मात्र आता यामध्ये वाढ पाहायला मिळत आहे.
शिवाय काही जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार दिवाळीनंतर कांदा बाजार भाव (Onion Market Price) चांगलेच कडाडणार आहेत. मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की कांद्याला किरकोळ बाजारात 40 रुपये प्रति किलोचा भाव मिळत आहे.
दरम्यान दिवाळीनंतर कांद्याला (onion crop) किरकोळ बाजारात 50 रुपये प्रति किलोपर्यंतचा भाव मिळणार असल्याचे व्यापारी नमूद करत आहेत. मित्रांनो ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला किरकोळ बाजारात कांदा 15 ते 25 रुपये प्रति किलो विक्री होत होता. मात्र दिवाळीनंतर हा कांदा पन्नास रुपये प्रति किलो विकला जाणार असल्याने शेतकऱ्यांना (Farmer) देखील याचा फायदा होणार आहे. दरम्यान, घाऊक बाजारात अजूनही नवीन कांदा अपेक्षित असा पाहायला मिळत नाही.
राज्यातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये अद्यापही नवा कांदा पाहायला मिळत नसल्याने तसेच बराकीत साठवलेला जुना कांद्याचा साठा देखील आता अल्प प्रमाणात उपलब्ध असल्याने कांद्याचा मोठा शोर्टेज बाजारात बघायला मिळत आहे. यामुळेच आता कांद्याच्या बाजारभावात वाढ होत आहे शिवाय आगामी काही दिवसात कांद्याच्या बाजारभावात यापेक्षाही अधिक वाढ होण्याची शक्यता आहे. दरम्यान शेतकऱ्यांच्या मते, बराकीत म्हणजेच कांदाचाळी साठवलेला कांदा मोठ्या प्रमाणात सडला असून याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. हवामान बदलामुळे कांदा चाळीतला कांदा जास्त काळ टिकला नाही.
आता ज्या शेतकऱ्यांचा जुना कांदा राहिला आहे अशा शेतकऱ्यांना या बाजार भावाचा फायदा होणार आहे. शेतकऱ्यांच्या मते आता काही मोजक्या शेतकऱ्यांकडे कांदा शिल्लक राहिला असेल. यामुळे या भाववाढीचा फायदा खूपच कमी शेतकरी बांधवांना होणार आहे. मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की, भारतात राजस्थान, मध्यप्रदेश आणि महाराष्ट्र या तीन राज्यात सर्वाधिक कांद्याचे उत्पादन घेतले जाते.
मात्र महाराष्ट्रात उत्पादित केला जाणारा कांदा बाजारात कायमच भाव खात असतो. महाराष्ट्रातील कांदा चवीला चांगला असल्याने त्याला बाजारात मोठी मागणी असते. दरम्यान दिवाळीच्या काळात कांद्याला मोठी मागणी येणार असून कांद्याच्या बाजारभावात वाढ होणार आहे. ऑक्टोबर महिन्याच्या शेवटी-शेवटी कांद्याच्या किमती गगनाला भिडणार असल्याचं सांगितलं जात आहे. तसेच बाजारात दिवाळी नंतर मोठ्या प्रमाणात नवीन कांदा येणार आहे, अशा परिस्थितीत नव्या कांद्याला देखील बाजारभाव चांगला मिळतो का याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहणार आहे.