Kanda Anudan Yojana : शिंदे-फडणवीस सरकारने काल कांदा अनुदानाबाबत एक मोठा निर्णय घेतला आहे. सरकारने घेतलेल्या या नवीन निर्णयानुसार ज्या शेतकऱ्यांनी सातबारावर ई पिकपेऱ्यामध्ये कांदा पिकाची नोंद केलेली नसेल अशा देखील शेतकऱ्यांना आता अनुदान मिळणार आहे. यासंदर्भात काल राज्य शासनाने एक सविस्तर असा शासन निर्णय जारी केला आहे.
सहकार पणन व वस्त्रोद्योग विभागाने हा शासन निर्णय काढला आहे. या निर्णयानुसार आता राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना पीक पेऱ्यामध्ये कांदा पिकाची नोंद नसली तरीदेखील अनुदान मिळणार आहे. मात्र, यासाठी तलाठी, कृषी सहायक व ग्रामसेवकांची एक समिती स्थापित होणार आहे. आणि या समितीला मग गाव पातळीवर जाऊन संबंधित शेतकऱ्यांनी प्रत्यक्षात कांदा लागवड केली आहे की नाही याची पाहणी करायची आहे.
हे पण वाचा :- वंदे भारत एक्सप्रेस; ‘या’ रूटवर धावणार देशातील 16वी Vande Bharat Train; मे महिन्यात होणार उदघाट्न, पहा…..
संबंधित समितीने पाहणी केल्यानंतर आपला अहवाल मग बाजार समितीकडे सुपूर्द करायचा आहे आणि त्यानंतर मग कांदा उत्पादक शेतकऱ्यांना 350 रुपये प्रतिक्विंटल इतकं अनुदान 200 क्विंटल च्या मर्यादेत शासनाकडून मंजूर केल जाणार आहे. निश्चितच शेतकऱ्यांची पीक पेऱ्याची अट दानदानासाठी रद्द करण्याची मागणी शासनाने मान्य केली असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
याशिवाय काल आणखी एक मोठा निर्णय झाला तो म्हणजे कांदा अनुदानासाठी अर्ज करण्याच्या मुदतीत वाढ देण्यात आली आहे. याआधी कांदा अनुदानासाठी 20 एप्रिल पर्यंत अर्ज करता येणार होते मात्र आता 30 एप्रिल 2023 पर्यंत कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान प्राप्तीसाठी अर्ज सादर करता येणार आहेत.
हे पण वाचा :- राज्य शासनाचा मोठा निर्णय; आता ‘या’ शेतकऱ्यांना पण कांदा अनुदान मिळणार, शेतकऱ्यांची मोठी चिंता दूर
दरम्यान आता शेतकऱ्यांना कांदा अनुदानाची प्रत्यक्ष रक्कम केव्हा मिळेल याबाबत देखील काही मीडिया रिपोर्ट्स मध्ये माहिती देण्यात आली आहे. एका प्रतिष्ठित मीडिया रिपोर्ट मध्ये दिलेल्या माहितीनुसार, कांदा अनुदानाचा प्रत्यक्ष लाभ शेतकऱ्यांना जून ते जुलै या कालावधीमध्ये दिला जाणार आहे.
म्हणजेच कांदा अनुदान मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना आणखी एक ते दोन महिना वाट पाहावी लागणार आहे. जून-जुलैमध्ये पात्र ठरलेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यात शासनाच्या माध्यमातून अनुदानाचा पैसा जमा केला जाणार असल्याची माहिती पणन विभागातील अधिकाऱ्यांनी दिली आहे.
हे पण वाचा :- मुंबई-सोलापूर वंदे भारत एक्सप्रेस आता ‘या’ शहरापर्यंत धावणार ! रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची मान्यता मिळाली