Kanda Anudan Yojana 2023 : कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. जसं की आपणास ठाऊकच आहे नुकत्याच काही दिवसांपूर्वी विधानसभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कांदा उत्पादकांसाठी सानुग्रह अनुदानाची घोषणा केली होती. सुरुवातीला तीनशे रुपये प्रति क्विंटल इतक अनुदान दिल जाईल त्यांनी सांगितलं मात्र यामध्ये नंतर पन्नास रुपये प्रति क्विंटल वाढ करण्यात आली आहे.
म्हणजेच आता कांदा उत्पादकांना 350 रुपये प्रति क्विंटल इतकं अनुदान मिळणार आहे. दरम्यान काल या योजनेचा शासन निर्णय निर्गमित झाला आहे. यामध्ये केव्हा आणि कोणता कांदा विक्री केलेल्या शेतकऱ्यांना किती क्विंटलचा मर्यादित अनुदान मिळणार आहे याविषयी सविस्तर माहिती दिलेली आहे. आज आपण हाच शासन निर्णय जाणून घेणार आहोत.
या शासन निर्णयानुसार, राज्यातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समिती, खाजगी खासगी बाजार समित्यांमध्ये, थेट पणन अनुज्ञप्तीधारकाकडे किंवा नाफेडकडे कांदा विक्री केलेल्या शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल 350 रुपये अनुदान 200 क्विंटलच्या मर्यादित मिळणार आहे. हे अनुदान केवळ लेट खरीप हंगामातील लाल कांद्याला राहणार आहे. एक फेब्रुवारी 2023 ते 31 मार्च 2023 म्हणजेच या दोन महिन्यात विक्री केलेल्याच लाल कांद्याला अनुदान दिले जाणार आहे.
म्हणजेच एक फेब्रुवारी 2023 ते 31 मार्च 2023 पर्यंत एखाद्या शेतकऱ्याने दोनशे क्विंटल पर्यंतचा कांदा विक्री केला तर त्याला 70 हजारापर्यंतचा अनुदान मिळणार आहे. यामुळे शेतकरी बांधव आपला लाल कांदा विक्रीसाठी लगबग करत आहेत. नाशिक जिल्ह्यातील उमराणे, मुंगसे, नामपूर सटाणा कळवण इत्यादी ठिकाणी कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक होत आहे.
निश्चितच 31 मार्चपर्यंत विक्री केलेल्या कांद्याला अनुदान मिळणार असल्याने शेतकऱ्यांकडून कांदा विक्रीसाठी आता कंबर कसण्यात आली आहे. या अनुदानामुळे आता शेतकऱ्यांना दिलासा मिळेल यात शँका नाही. पण शेतकऱ्यांना किमान पाचशे रुपये अनुदान दिले गेले पाहिजे होतं असं मत शेतकरी यावेळी व्यक्त करत आहेत.