Kanda Anudan New GR : गेल्या वर्षी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागला. अजूनही कांदा उत्पादकांवर संकटे कायम आहेत मात्र गेल्यावर्षी कांद्याच्या बाबतीत खूपच बिकट परिस्थिती पाहायला मिळाली होती. कांदा अक्षरशा रद्दीच्या दरात विकला जात होता.
यामुळे पिकासाठी आलेला खर्च देखील शेतकऱ्यांना भरून काढता आला नाही. परिणामी राज्यातील अनेक कांदा उत्पादक कर्जबाजारी झालेत. यामुळे राज्यातील शेतकरी संघटनांच्या माध्यमातून कांदा उत्पादकांना दिलासा म्हणून अनुदान देण्याची मागणी करण्यात आली. विरोधी पक्षातील नेत्यांनी देखील हा मुद्दा लावून धरला.
यामुळे त्यावेळी नव्यानेच सत्तेत आलेल्या शिंदे सरकारने कांदा उत्पादकांना 350 रुपये प्रति क्विंटल एवढे अनुदान 200 क्विंटलच्या मर्यादित देण्याची मोठी घोषणा विधानसभेत केली. यानुसार सध्या कांदा अनुदान वाटपाचा कार्यक्रम सुरू आहे. दरम्यान याच कांदा अनुदानाबाबत नवीन जीआर समोर आला आहे.
दोन दिवसांपूर्वी अर्थातच 8 फेब्रुवारी 2024 ला हा नवीन जीआर समोर आला आहे. आज आपण या जीआर मध्ये नेमके काय म्हटले आहे आणि कोणत्या शेतकऱ्यांना आता कांदा अनुदानाचा फायदा मिळणार आहे याविषयी थोडक्यात जाणून घेणार आहोत.
खरे तर कांदा अनुदानासाठी पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना टप्प्याटप्प्याने अनुदानाचा पैसा उपलब्ध करून दिला जात आहे. अनुदानाचा पैसा थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत आहे.
या अनुदानाअंतर्गत पहिल्या टप्प्यात पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना दहा हजार रुपये दुसऱ्या टप्प्यात दहा हजार रुपये आणि दुसऱ्या टप्पे चार हजार रुपये म्हणजेच आतापर्यंत पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना जवळपास 24 हजार रुपयांपर्यंतची मदत मिळालेली आहे.
तथापि काही शेतकऱ्यांनी अनुदानासाठी ग्राह्य धरलेल्या काळात मोठ्या प्रमाणात कांद्याची विक्री केलेली होती. त्यामुळे अजूनही अनेक शेतकऱ्यांना कांदा अनुदानाची संपूर्ण रक्कम मिळालेली नाहीये.
दरम्यान, याच शेतकऱ्यांच्या कांदा अनुदानाच्या उर्वरित रकमेबाबत महत्वाचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. हिवाळी अधिवेशनातं कांदा अनुदान वितरित करण्यासाठी 300 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करून देण्यात आली होती.
दरम्यान आता 8 फेब्रुवारीला शासन निर्णय काढून यापैकी 211 कोटी 66 लाख रुपयांचा निधी संबंधित शेतकऱ्यांना वितरित करण्यास मान्यता देण्यात आली आहे. आता या निधीतून वीस हजार रुपये प्रति शेतकरी एवढा अनुदानाचा पैसा संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे.
याचाच अर्थ ज्या शेतकऱ्याची कांदा अनुदानाची रक्कम 44 हजारापर्यंत असेल त्यांना आत्तापर्यंत 24 हजार रुपये प्राप्त झाले असून त्यांना आणखी 20 हजारापर्यंतची रक्कम मिळाली तर त्यांना संपूर्ण अनुदानाची रक्कम प्राप्त होईल. मात्र ज्या शेतकऱ्यांची 44 हजार रुपयांपेक्षा अधिकची रक्कम असेल त्यांना येत्या काही महिन्यांमध्ये उर्वरित रक्कम मिळू शकते असा विश्वास व्यक्त होत आहे.