Kanda Anudan Arj Document List : शिंदे-फडणवीस सरकारने नुकताच एक मोठा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने अनुदानाची घोषणा केली आहे. एक फेब्रुवारी 2023 ते 31 मार्च 2023 या कालावधीमध्ये विक्री केलेल्या लाल कांद्याला शासनाकडून अनुदान दिले जाणार आहे.
350 रुपये प्रति क्विंटल इतके अनुदान 200 क्विंटलच्या मर्यादित दिले जाणार असून यासाठी तीन एप्रिल पासून अर्ज सादर करता येणार आहेत. अर्ज हा शेतकऱ्यांना विहित नमुन्यामध्ये सादर करायचा असून 20 एप्रिल 2023 ही अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक राहणार आहे. असे असतानाच मात्र कांदा अनुदान मिळवण्यासाठी बोगसगिरी सुरू असल्याचे धक्कादायक आरोप शेतकऱ्यांच्या माध्यमातून केले जात आहेत.
कांदा अनुदान मिळवण्यासाठी बनावट पद्धतीने कांदा विक्री सुरू असल्याचा आरोप होत आहे. यामुळे आता ही बनावटगिरी रोखण्यासाठी शासनाकडून हे अनुदान मिळवण्यासाठी काही कागदपत्र आवश्यक करण्यात आले आहेत. या कागदपत्रांची पूर्तता केल्याशिवाय शेतकऱ्यांना अनुदान दिले जाणार नाही अशी माहिती देण्यात आली आहे.
हे पण वाचा :- ब्रेकिंग ! एप्रिल महिन्यात ‘या’ रूटवर सुरु होणार वंदे भारत ट्रेन; किती असेल तिकीट, कसा असेल रूट, पहा….
दरम्यान, आज आपण कांदा अनुदान मिळवण्यासाठी आता कोण-कोणत्या कागदपत्रांची गरज शेतकऱ्यांना लागणार आहे याविषयी थोडक्यात जाणून घेण्याचा सविस्तर प्रयत्न करणार आहोत. तत्पूर्वी आपण शेतकरी बांधवांना कांदा अनुदानासाठी अर्ज करताना विहित नमुना अर्ज कुठे उपलब्ध होईल याची माहिती जाणून घेऊ.
संबंधित अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शेतकऱ्यांना राज्यातील सर्व बाजार समिती, खाजगी बाजार समिती, पणन परवानाधारक, नाफेड खरेदी विक्री केंद्र, जिल्हा उपनिबंधक, तालुका सहायक निबंधक, सहकारी संस्थांच्या कार्यालयात विहित नमुन्यातील अर्ज मिळणार आहेत.
विशेष बाब अशी की, हे अर्ज विनामूल्य उपलब्ध आहेत, त्यामुळे कुणी अर्जासाठी पैशाची मागणी करत असेल तर शेतकऱ्यांना तक्रार करता येणार आहे. दरम्यान विहीत नमुन्यातील अर्ज काळजीपूर्वक भरून शेतकऱ्यांना 20 एप्रिल पर्यंत सादर करण्याचे आवाहन केले जात आहे. आता आपण यासाठी कोणकोणते कागदपत्र शेतकऱ्यांना सादर करावे लागतील याबाबत जाणून घेऊया.
हे पण वाचा :- शेतकऱ्यांनो, कांदा अनुदान मिळवायचे असेल तर 20 एप्रिलपर्यंत ‘हे’ काम करा; पणन महासंचालकांची माहिती
खालील कागदपत्रांची लागेल गरज
कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान मिळवण्यासाठी विक्री केलेल्या कांदा विक्रीची आडत्याकडील मुळपट्टी किंवा सौदापट्टी द्यावी लागणार आहे.
तसेच कांदा लागवड केलेल्या शेतकऱ्यांनाच कांदा अनुदान मिळावे म्हणून कांदा पिकाची नोंद असलेला ७/१२ उतारा द्यावा लागणार आहे.
अनुदानाची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचा मानसशासनाचा आहे यामुळे बँक खाते क्रमांक लागणार आहे, यासाठी बँक पासबुकच्या पहिल्या पानाची झेरॉक्स लागेल, आणि शेतकऱ्यांना आपल्या आधार कार्डची झेरॉक्स द्यावी लागेल.
शिवाय ज्या प्रकरणात ७/१२ वडिलांच्या नावे व विक्रीपट्टी मुलाच्या अथवा अन्य कुटुंबियांच्या नावे आहे, अशा प्रकरणामध्ये सहमती असणारे शपथ पत्र आवश्यक राहणार आहे.
या ठिकाणी एक गोष्ट विशेष अशी की, कांदा लागवड केल्याची नोंद असलेला 7/12 हा कांदा विक्री केल्याच्या 3 महिन्यापूर्वीचा असणे गरजेचे आहे. याची नोंद देखील संबंधित उताऱ्यावर 3 महिन्याच्या पूर्वीच लावलेली असणे बंधनकारक आहे. तसेच तलाठ्याचा दाखला या ठिकाणी अपात्र राहणार आहे.
हे पण वाचा :- डोंबिवली, ठाणेकरांना आनंदाची बातमी! ‘हा’ बहुचर्चित पूल या दिवशी होणार खुला, आता Thane-Dombivali प्रवास मात्र 20 मिनिटात, पहा….