Kanda Anudan 2023 : महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. जसं की आपणास ठाऊकच आहे गेल्या काही महिन्यांपासून कांद्याला अतिशय कवडीमोल दर मिळत आहे. या पार्श्वभूमीवर कांद्याला अनुदान देण्याची मागणी शेतकरी संघटना आणि विरोधकांकडून वारंवार होत होती.
शिंदे फडणवीस सरकारने देखील विरोधकांचा विरोधात एखादा उत्पादक शेतकऱ्यांची मागणी लक्षात घेता कांद्याला अनुदान देण्याचा ऐतिहासिक निर्णय नुकत्याच काही दिवसांपूर्वी घेतला आहे. राज्यातील कांदा उत्पादकांना तीनशे रुपये प्रति क्विंटल इतक सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला. मात्र या शासन निर्णयावर कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली.
हे पण वाचा :- मोठी बातमी ! म्हाडाच्या पुणे मंडळातील 6058 घरांची सोडत उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते ‘या’ दिवशी निघणार
आधीच बेजार झालेल्या शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ लावण्याचे काम राज्य शासनाच्या माध्यमातून होत असल्याचा घनाघात करण्यात आला. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने अनुदानात वाढ करण्याची मागणी केली होती. विरोधकाकडून देखील सानुग्रह अनुदानात वाढ व्हावी अशी मागणी होत होती. दरम्यान आता शिंदे फडणवीस सरकारने अनुदानात वाढ करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.
याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत माहिती दिली आहे. मुख्यमंत्री महोदय यांनी दिलेल्या माहितीनुसार कांदा सामुग्रह अनुदान जे की 300 रुपये प्रति क्विंटल इतके ठेवण्यात आले होते. त्यामध्ये वाढ करण्यात आली असून आता 350 रुपये प्रतिक्विंटल इतकं सानुग्रह अनुदान कांदा उत्पादक शेतकऱ्यांना देऊ केल जाणार आहे.
यासोबतच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जे शेतकरी बांधव महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत वंचित आहेत त्या शेतकऱ्यांना देखील कर्जमाफीचा लाभ देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असल्याची माहिती दिली आहे. निश्चितच शासनाच्या या निर्णयामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना तूर्तास दिलासा मिळेल असे सांगितले जात आहे. पण कांदा उत्पादक शेतकरी बांधव किमान पाचशे रुपये प्रति क्विंटल अनुदान कांद्याला मिळावे अशी मागणी करत आहेत.
हे पण वाचा :- मुंबईत घर घेणाऱ्यांसाठी खुशखबर ! म्हाडाच्या मुंबई मंडळातील घर सोडतसंदर्भात समोर आली ‘ही’ मोठी बातमी