Kalyan Railway News : भारतात रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या ही विशेष उल्लेखनीय आहे. एका शहरातून दुसऱ्या शहरात प्रवास करण्यासाठी रेल्वेचा वापर सर्वाधिक केला जातो. विशेषतः लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी रेल्वेचा वापर अधिक केला जातो. रेल्वेचा प्रवास अधिक सुरक्षित गतिमान आणि खिशाला परवडणारा असल्याने सर्वसामान्य नेहमीच रेल्वेच्या प्रवाशाला पसंती दाखवतात.
दरम्यान कल्याण येथील रेल्वे प्रवाशांसाठी एक अतिशय मोठी बातमी समोर येत आहे. खरंतर कल्याण एक महत्त्वाचे रेल्वे स्थानक आहे मात्र या कल्याण रेल्वे स्थानकावर काही लांब पल्ल्याच्या मेल आणि एक्सप्रेस गाड्यांना थांबा देण्यात आलेला नाही.
यामुळे येथील प्रवाशांना लांब अंतरावरील गाडीने प्रवास करण्यासाठी दुसऱ्या रेल्वे स्थानकावर जाऊन गाडी पकडावी लागत आहे. सध्या येथील प्रवासी लांब पल्ल्याची एक्सप्रेस गाडी पकडण्यासाठी सीएसएमटी किंवा कुर्ला रेल्वे स्थानकावर जातात.
मात्र आता कल्याण येथील रेल्वे प्रवाशांना दिलासा देण्यासाठी रेल्वेने या रेल्वे स्थानकावर काही महत्त्वाच्या गाड्यांना थांबा देण्याचा महत्वाचा निर्णय घेतला आहे. रेल्वेने घेतलेल्या या निर्णयामुळे येथील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार असल्याचा आशावाद या निमित्ताने व्यक्त केला जात आहे.
आता आपण रेल्वे प्रशासनाने कल्याण रेल्वे स्थानकावर कोणत्या मेल आणि एक्सप्रेस गाड्यांना थांबा देण्याचा निर्णय घेतला आहे याविषयी थोडक्यात पण सविस्तर जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कल्याण स्थानकात कोणत्या गाड्यांना मिळणार थांबा
23 ऑगस्टपासून 12261/2 सीएसएमटी-हावडा-सीएसएमटी दुरांतो, 82355 पाटणा-सीएसएमटी, 18519 विशाखापट्टणम-एलटीटी, 17221 काकीनाडा पोर्ट-एलटीटी या दोन्ही गाड्यां कल्याण स्थानकात थांबा दिला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.
25 ऑगस्टपासून 82356 सीएसएमटी-पाटणा सुविधा आणि 18520 एलटीटी-विशाखापट्टणम एक्स्प्रेसला कल्याण स्थानकात थांबा मिळणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी यावेळी दिली आहे.
24 ऑगस्टपासून 19668 म्हैसूर-उदयपूर सिटी हमसफर, 17221/2 काकीनाडा पोर्ट-एलटीटी-काकीनाडा पोर्ट एक्स्प्रेसला कल्याण स्थानकात थांबा मिळणार असल्याचे वृत्त हाती आले आहे.
28 ऑगस्टपासून 19667 उदयपूर सिटी-म्हैसूर हमसफर एक्स्प्रेसला कल्याणमध्ये थांबा मिळणार आहे.
तसेच 23 ऑगस्टपासून म्हणजे आजपासून 17319/20 हैदराबाद-हुबळी-हैदराबाद एक्स्प्रेसला 23 ऑगस्टपासून कल्याणमध्ये थांबा दिला जाणार आहे.
दरम्यान कल्याण स्थानकात या मेल आणि एक्सप्रेस गाड्यांना देण्यात आलेला थांबा हा प्रायोगिक तत्त्वावर राहणार आहे. पुढील सहा महिन्यांसाठी हा निर्णय लागू राहणार आहे. तसेच या मेल आणि एक्सप्रेस गाड्या केवळ दोन मिनिटांसाठी कल्याण स्थानकात थांबणार आहेत. मात्र तात्पुरत्या स्वरूपात का होईना पण हा निर्णय येथील प्रवाशांसाठी दिलासादायक राहणार यात शंकाच नाही.