Job Alert : नोकरीच्या शोधात असलेल्या पदवीधर तरुणांसाठी एक मोठी गुड न्यूज समोर येत आहे. दिल्ली उच्च न्यायालयात विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जात असून पदवीधर उमेदवार या पदांसाठी अर्ज करू शकणार आहेत.
यासाठी अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली असून ऑनलाइन पद्धतीने विविध पदांसाठी अर्ज सादर करायचे आहेत. अशा परिस्थितीत आज आपण या भरती संदर्भात महत्त्वाची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
किती आणि कोणती पदे भरली जातील?
दिल्ली उच्च न्यायालयात वरिष्ठ वैयक्तिक सहाय्यक पदाच्या 60 जागा, वैयक्तिक सहाय्यक या पदाच्या 67 जागा, अशा एकूण 127 जागांसाठी पदभरती राबवली जात आहे.
हे पण वाचा :- अभिमानास्पद ! वंदे भारत एक्सप्रेसच्या विकासात महाराष्ट्राचा वाटा; आता ‘या’ जिल्ह्यात तयार होणार Vande Bharat Train
अर्ज कसा सादर करायचा?
वर नमूद करण्यात आलेल्या पदांसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. वरिष्ठ वैयक्तिक सहाय्यक पदासाठी अर्ज करणे हेतू वरिष्ठ वैयक्तिक सहाय्यक या लिंक वर क्लिक करायचे आहे. तसेच वैयक्तिक सहाय्यक या पदासाठी अर्ज करणे हेतू दिल्ली उच्च न्यायालय वैयक्तिक सहाय्यक या लिंक वर क्लिक करायचे आहे.
अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक
31 मार्च 2023 पर्यंत अर्ज सादर करता येणार आहेत. तसेच अर्जामध्ये दुरुस्ती करण्यासाठी तीन एप्रिल 2023 पर्यंतचा कालावधी राहणार आहे.
अर्ज फी किती
या भरतीसाठी सामान्य प्रवर्गातील उमेदवारांना एक हजार रुपये आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांना आठशे रुपये फी राहणार आहे.
आवश्यक शैक्षणिक पात्रता अन वयोमर्यादा
वर नमूद करण्यात आलेल्या पदांसाठी अर्ज करणारा उमेदवार पदवीधर असावा तसेच त्याने टायपिंग कोर्स 40wpm पूर्ण केलेला असावा. या पदांसाठी अर्ज करणारा उमेदवार 18 ते 32 वर्षे वयोगटातील असावा.
निवड प्रक्रिया
या पदांसाठी एकूण चार टप्प्यात उमेदवारांची चाचणी घेतली जाणार असून त्यानंतर उमेदवार संबंधित पदांसाठी नियुक्त केले जाणार आहेत.
जाहिरात कुठ बघणार
जाहिरात पाहण्यासाठी https://recruitment.nta.nic.in/DelhiHCRecruitment/File/ViewFile?FileId=1&LangId=P या लिंक वर क्लिक करा.
हे पण वाचा :- मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! आता मेट्रो थेट उल्हासनगरपर्यंत धावणार; असा राहणार रूटमॅप, पहा