Job Alert : बँकेत जॉब शोधणाऱ्या तरुणांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर येत आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडियाने मोठी पदभरती आयोजित केली आहे. निश्चितच जे तरुण बँकिंग जॉब साठी तयारी करत आहेत त्यांच्यासाठी ही आनंदाची बातमी राहणार आहे. अशा परिस्थितीत आज आपण या पदभरती संदर्भात सर्व महत्वाची माहिती जाणून घेणार आहोत.
किती पदांसाठी आणि कोणत्या पदांसाठी भरती आयोजित झाली आहे, अर्ज कसा करावयाचा आहे, कोणत्या तारखेपर्यंत अर्ज स्वीकारले जातील, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क आणि निवड प्रक्रिया कशी राहील याबाबत माहिती घेणार आहोत.
हे पण वाचा :- महाराष्ट्रातील गरीब कुटुंबाला 100 रुपयात रवा, डाळ, साखर, तेल आनंदाचा शिधा मिळणार; पण नेमका लाभ कुणाला? वाचा सविस्तर
किती आणि कोणत्या पदासाठी आयोजित झाली आहे पदभरती?
सेंट्रल बँक ऑफ इंडिया कडून पदभरती सुरू झाली असून त्याच्या माध्यमातून 147 रिक्त पदे भरले जाणार आहेत. कोणती पदे भरली जातील या संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी उमेदवार अधिकृत अधिसूचना पाहू शकतात. ही अधिसूचना इच्छुक उमेदवारांना सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या Centralbankofindia.co.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
अर्ज कसा करावा लागेल?
अधिसूचना संपूर्ण काळजीपूर्वक वाचल्यानंतर इच्छुक आणि पात्र उमेदवार संबंधित रिक्त पदांसाठी Centralbankofindia.co.in या बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अर्ज करू शकणार आहेत. अर्ज करण्यापूर्वी मात्र पात्रता काळजीपूर्वक वाचणे आणि पात्र लोकांनीच यासाठी अर्ज करणे अपेक्षित आहे.
हे पण वाचा :- Mhada News : मोठी बातमी ! म्हाडाच्या घरासाठीच्या अनामत रक्कमेत मोठी वाढ; आता भरावी लागणार ‘इतकी’ रक्कम
अर्ज करण्याची शेवटची दिनांक कोणती
इच्छुक उमेदवार या पदभरती अंतर्गत 15 मार्च 2023 पर्यंत अर्ज करू शकणार आहेत. अर्ज स्वीकृत करण्याची प्रोसेस सुरू झाली असून इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने वर नमूद केलेल्या संकेतस्थळावर जाऊन अर्ज करावयाचा आहे.
शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा
शैक्षणिक पात्रता पदनिहाय बदलणार आहे. व्यवस्थापक पदासाठी मात्र संबंधित विषयातील बी ई आणि बी टेक पर्यंतच शिक्षण घेतलेले असणे अनिवार्य असून मान्यता प्राप्त शिक्षण संस्थेच प्रमाणपत्र आवश्यक राहणार आहे. पद निहाय वयोमर्यादा बदलणार आहे. यासाठी अधिसूचना बघावी लागणार आहे.
किती अर्ज शुल्क भरावा लागेल
जनरल कॅटेगिरी मधील इच्छुक उमेदवारांना एक हजार रुपये राज शुल्क भरावा लागेल सोबतच 18% जीएसटी एक्स्ट्रा द्यावी लागणार आहे. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, पीडब्ल्यूडी आणि महिला उमेदवारांना मात्र या ठिकाणी कोणतीही अर्ज फी घेतली जाणार नाही.
निवड प्रक्रिया कशी राहील
सर्वप्रथम ऑनलाइन चाचणी परीक्षा बँकेच्या माध्यमातून आयोजित होईल यामध्ये उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना पुढच्या टप्प्यात मुलाखतीसाठी बोलावले जाईल. जो उमेदवार ऑनलाईन चाचणी परीक्षा आणि मुलाखतीमध्ये उत्तीर्ण होईल अशा उमेदवारांना संबंधित पदावर रुजू केल जाणार आहे.
हे पण वाचा :- ब्रेकिंग : तलाठी भरतीच नियोजन ठरलं ! ‘त्या’ जिल्ह्यात भरली जाणार ‘इतकी’ पदे; ‘या’ तारखेला सुरू होणार अर्ज प्रक्रिया