Job Alert : राजधानी मुंबईत नोकरी शोधणाऱ्या तरुणांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. शिपिंग कॉर्पोरेशन मुंबई या ठिकाणी रिक्त पदांसाठी भरती आयोजित करण्यात आली आहे. क्रेन ऑपरेटर या पदासाठी मुंबई शिपिंग कॉर्पोरेशनने थेट मुलाखतीच्या माध्यमातून पदभरती राबवली जात आहेत. शिपिंग कॉर्पोरेशन मुंबईमध्ये नोकरी करू इच्छिणाऱ्या पात्र उमेदवारांसाठी एक सुवर्णसंधी चालून आली आहे.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की क्रेन ऑपरेटर या पदासाठी थेट मुलाखतीच्या माध्यमातून पदभरती राबवली जाणार आहे. या भरतीसाठी दुसरी कोणतीच परीक्षा आयोजित राहणार नाही. थेट मुलाखतीच्या माध्यमातून पदभरती राबवली जाईल.
मुलाखतीत निवड झालेल्या तरुणांची वैद्यकीय तपासणी मात्र केली जाणार आहे. अशा परिस्थितीत आज आपण या क्रेन ऑपरेटर पदासाठी नेमकी शैक्षणिक पात्रता, किती पद भरले जातील, मुलाखत कुठे होईल आणि कधी होईल यांसारखी माहिती जाणून घेणार आहोत.
किती पदांसाठी आयोजित आहे भरती?
शिपिंग कॉर्पोरेशन मुंबई या ठिकाणी एकूण चार क्रेन ऑपरेटर यां पदांसाठी जाहिरात निघाली आहे.
आवश्यक शैक्षणिक पात्रता
नॅशनल कौन्सिल ऑफ ट्रेनिंग इन व्होकेशनल ट्रेड, कामगार मंत्रालय, भारत सरकार (NCTVT) द्वारे जारी केलेल्या फिटर/मरीन फिटर किंवा डिझेल/मोटर मेकॅनिक किंवा मशीनिस्ट किंवा वेल्डरच्या व्यापारातील मान्यताप्राप्त पॉलिटेक्निकमधून मेकॅनिकल इंजिनीअरिंगचा डिप्लोमा किंवा राष्ट्रीय व्यापार प्रमाणपत्र. किंवा राज्य सरकारच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेद्वारे (ITI).
क्रेन ऑपरेटर म्हणून किमान एक वर्षाचा अनुभव.
शैक्षणिक पात्रतेबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी एकदा अधिसूचना पूर्ण वाचावी.
मुलाखतीचा पत्ता आणि मुलाखतीचा दिनांक
क्रेन ऑपरेटर या पदासाठी 22 फेब्रुवारी 2023 रोजी शिपिंग हाऊस द शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड 245, मादाम कामा रोड मुंबई 400021
जाहिरात कुठे पाहायची
या पदभरतीची जाहिरात पाहण्यासाठी शिपिंग कॉर्पोरेशन मुंबई रिक्रुटमेंट 2023 या लिंक वर क्लिक करा.
या पदभरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तसेच शिपिंग कॉर्पोरेशन मुंबई यांच्या अधिकृत वेबसाईटवर भेट देण्यासाठी https://www.shipindia.com/ या लिंक वर क्लिक करा.