India’s Shortest Highway : भारताची अर्थव्यवस्था ही सध्या जगातील पाचव्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. ही अर्थव्यवस्था येत्या काही वर्षात तिसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठे अर्थव्यवस्था बनू शकते असा विश्वास अर्थशास्त्रातील तज्ञांनी व्यक्त केला आहे. खरे तर कोणत्याही विकसित राष्ट्रात तेथील दळणवळण व्यवस्था महत्त्वाची भूमिका निभावत असते.
हीच गोष्ट हेरून गेल्या काही वर्षांमध्ये शासनाच्या माध्यमातून विविध रस्ते विकासाच्या प्रकल्पांची कामे पूर्ण करण्यात आली आहेत. अनेक मोठमोठ्या महामार्गाची कामे पूर्ण झाली आहेत.
महाराष्ट्रात देखील विविध महामार्गाची कामे पूर्ण झाली आहेत. राज्यात समृद्धी महामार्गाचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. हा मार्ग राजधानी मुंबई आणि उपराजधानी नागपूर यांना कनेक्ट करणार आहे.
तसेच काही महामार्गाची कामे सुरू आहेत. एवढेच नाही तर महाराष्ट्रातील सर्वाधिक लांबीच्या महामार्गाचे काम प्रस्तावित करण्यात आले आहे. राज्यातील सर्वाधिक लांबीचा महामार्ग नागपूर ते गोवा दरम्यान विकसित केला जाणार आहे.
या सर्वाधिक लांबीच्या महामार्गासाठी आवश्यक असलेल्या जमिनीच्या भूसंपादनासाठी अधिकाऱ्यांची नियुक्ती देखील झाली आहे. परंतु या महामार्गाचा संबंधित जमीन मालकांच्या माध्यमातून मोठा विरोध केला जात आहे.
एकंदरित महाराष्ट्रासहित संपूर्ण देशात मोठ मोठ्या महामार्गांचे जाळे तयार करण्याचे काम सध्या सुरू आहे. पण तुम्हाला भारतातील सर्वात छोटा महामार्ग कोणता या विषयी माहिती आहे का? आम्ही आपणास सांगू इच्छितो की देशातील सर्वात छोटा महामार्ग हा आपल्या महाराष्ट्रात आहे.
देशातील सर्वात छोटा महामार्ग आपल्या महाराष्ट्रात
नॅशनल हायवे 118 आणि नॅशनल हायवे 548 हे देशातील सर्वात छोटे महामार्ग म्हणून ओळखले जातात. यातील एक महामार्ग झारखंड मधला आहे तर एक महामार्ग आपल्या महाराष्ट्रातील आहे. हे दोन्ही महामार्ग अवघे पाच किलोमीटर लांबीचे आहेत.
झारखंड मधील महामार्ग नॅशनल हायवे 118 आसनबनी आणि जमशेदपूर या दोन शहरांना जोडतो. दुसरीकडे महाराष्ट्रातील नॅशनल हायवे 548 हा महामार्ग नवी मुंबई आणि कळंबोली यांना जोडतो. हा पाच किलोमीटर लांबीचा महामार्ग राज्यातीलच नव्हे तर भारतातील सर्वात छोटा महामार्ग म्हणून ओळखला जात आहे.