Indias New Electric Tractor : भारतीय शेती गेल्या काही वर्षांपासून पूर्णपणे बदलली आहे. काळाच्या ओघात भारतातील शेतीचा व्यवसाय देखील आता पूर्णपणे आधुनिक झाला आहे. पूर्वी शेतीची कामे मनुष्यबळाच्या साहाय्याने पूर्ण केली जात असत. पण आता शेतीमध्ये नवनवीन शेती तंत्रांचा आणि यंत्रांचा समावेश झाला आहे.
ट्रॅक्टर सारख्या यंत्रांमुळे आता शेतीचा व्यवसाय सोपा झाला आहे. आता छोटे-छोटे शेतकरी देखील ट्रॅक्टरच्या सहाय्याने शेतीची कामे करत आहेत. यामुळे कमी कालावधीत अन कमी खर्चात शेतकऱ्यांना शेतीची कामे करता येणे शक्य होत आहे. विशेष म्हणजे बाजारात आता इलेक्ट्रिक ट्रॅक्टर देखील उपलब्ध झाला आहे.
AutoNxt X45 हा इलेक्ट्रिक ट्रॅक्टर भारतात नुकताच लॉन्च करण्यात आला असून या ट्रॅक्टरमुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. दरम्यान आज आपण या ट्रॅक्टरच्या विशेषता आणि याच्या किमती बाबत सविस्तर अशी माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कसा आहे इलेक्ट्रिक ट्रॅक्टर
AutoNxt X45 हा इलेक्ट्रिक ट्रॅक्टर डिझेल ट्रॅक्टरच्या तुलनेत फायदेशीर आहे. एकदा चार्ज केल्यानंतर या ट्रॅक्टरने तब्बल आठ एकर शेत नांगरता येऊ शकते असा दावा कंपनीने केला आहे. याला एकदा चार्ज करण्यासाठी तीन तासांचा वेळ लागतो अन हा ट्रॅक्टर फुल चार्ज झाला की सहा तास शेतीची कामे करू शकतो.
कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, नियमित (सिंगल फेज) चार्जरसह, या इलेक्ट्रिक ट्रॅक्टरची बॅटरी 6 तासात अन तीन-फेज चार्जरसह, त्याची बॅटरी केवळ 3 तासांमध्ये फुल चार्ज होते. हा ट्रॅक्टर 10 ते 15 टन लोड उचलू शकतो.
या ट्रॅक्टर मध्ये वापरण्यात आलेली बॅटरी आठ ते दहा वर्षे टिकू शकते. मात्र बॅटरीची लाईफ सायकल ही त्याच्या युजवर अवलंबून राहणार आहे. या ट्रॅक्टरचे डिझाईन हे डिझेल ट्रॅक्टर प्रमाणेच आहे.
कंपनीने यात 32 KW क्षमतेची इलेक्ट्रिक मोटर दिली आहे जी जास्तीत जास्त 45 HP पॉवर जनरेट करण्यास सक्षम असल्याचा दावा कंपनीने केला आहे. यात 35 KWHr क्षमतेचा बॅटरी पॅक आहे, जो एका चार्जवर सुमारे 8 एकर क्षेत्रात 6-8 तास काम करू शकतो. यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चात बचत होणार आहे.
ट्रॅक्टरची किंमत किती आहे ?
अनेकांनां भारतात अलीकडेच लॉन्च झालेल्या या इलेक्ट्रिक ट्रॅक्टरच्या किमती बाबत जाणून घेण्याची उत्सुकता आहे. कंपनीने सांगितल्याप्रमाणे या इलेक्ट्रिक ट्रॅक्टरची सुरुवातीची किंमत 15 लाख रुपये आहे. म्हणजेच याची किंमत 15 लाख रुपयांपासून सुरू होते. यामध्ये इलेक्ट्रिक वाहनांवर दिल्या जाणाऱ्या सबसिडीचा समावेश नाहीये.