Indian Railway Ticket Discount : भारतीय रेल्वेचे नेटवर्क हे देशातील कानाकोपऱ्यात पोहोचलेले आहे. देशातील असा कोणताच भाग नाही जिथे रेल्वे पोहोचलेले नाही. हेच कारण आहे की, लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी नेहमीच प्रवासी रेल्वेला पसंती दाखवतात.
एका शहरातून दुसऱ्या शहरात प्रवास करायचा असेल तर सर्वप्रथम रेल्वेचाच विचार मनात येतो. याच सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे रेल्वेचा प्रवास हा खूपच परवडणारा आहे. स्वस्तात रेल्वेचा प्रवास केला जाऊ शकतो शिवाय रेल्वेचा प्रवास हा गतिमान आणि सुरक्षित आहे.
बस आणि इतर पर्यायी व्यवस्थेपेक्षा रेल्वेने जलद गतीने प्रवास करता येत असल्याने रोजाना लाखो नागरिक रेल्वेने प्रवास करतात. विशेष म्हणजे रेल्वे प्रवाशांसाठी भारतीय रेल्वे कडून काही सोई सुविधा देखील पुरवल्या जातात. तसेच काही प्रवाशांना तिकीट दरात रेल्वे कडून सवलत देखील पुरवली जाते.
ज्येष्ठ नागरिकांना रेल्वेकडून तिकीट दरात सवलत दिली जात आहे. याशिवाय इतरही लोकांना रेल्वेने प्रवास करताना तिकीट दरात सवलत दिली जाते. अशा परिस्थितीत आज आपण भारतीय रेल्वेकडून देशातील कोणकोणत्या नागरिकांना तिकीट दरात सवलत दिली जाते याबाबत थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
या लोकांना मिळते रेल्वे प्रवासात मोठी सूट
मीडिया रिपोर्टनुसार, भारतीय रेल्वेने प्रवास करण्यासाठी दिव्यांग, नेत्रहीन आणि मानसिक अवस्था ठीक नसलेल्या प्रवाशांना तिकीट दरात 75 टक्के सवलत दिली जाते. जनरल क्लास, स्लीपर क्लास आणि थर्ड एसी मध्ये या प्रवाशांना 75% पर्यंत तिकीट दरात सवलत मिळते.
तसेच एसी फर्स्ट क्लास आणि सेकंड क्लास मध्ये प्रवास करताना या प्रवाशांना 50 टक्के एवढी सवलत मिळते. पण राजधानी आणि शताब्दी सारख्या एक्सप्रेस गाड्यांमध्ये प्रवास करताना या प्रवाशांना केवळ 25% एवढीच सवलत मिळते.
रेल्वेने तयार केलेल्या नियमानुसार मूकबधिरांना ट्रेनच्या प्रवासात 50 टक्के सवलत मिळते. या सोबतच अशा लोकांबरोबर असलेल्या लोकांना देखील समान सवलत मिळते.