Indian Railway News : भारतात रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या ही कोटींच्या घरात आहे. रोजाना लाखो लोक रेल्वेने प्रवास करतात. सर्वसामान्यांना परवडणारा आणि जलद, सुरक्षित प्रवास म्हणून रेल्वेच्या प्रवासाला ओळखले जाते. रेल्वे देखील प्रवाशांसाठी वेगवेगळ्या सुविधा पुरवते.
केंद्र शासनाने देखील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी रेल्वेचे जाळे विस्तारण्याचे धोरण आखले आहे. तसेच रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी वंदे भारत एक्सप्रेस सारखी हाय स्पीड ट्रेन देखील चालवली जात आहे. ही ट्रेन 2019 पासून रेल्वेच्या ताफ्यात सामील झाली आहे. आतापर्यंत देशातील एकूण 25 महत्त्वाच्या मार्गावर ही गाडी सुरू झाली आहे.
आगामी काही महिन्यात आणखी काही महत्त्वाच्या मार्गावर या गाडीला सुरू करण्याचे नियोजन रेल्वेने आखले आहे. यामुळे सध्या देशात या गाडीची मोठी चर्चा आहे. खरंतर या गाडीमुळे रेल्वे प्रवाशांना जलद प्रवासाचा अनुभव घेता येत आहे. या गाडीत रेल्वे प्रवाशांसाठी विविध टॉप क्लास सुविधा पुरवल्या जात आहेत.
यामुळे प्रवाशांचा प्रवास जलद, आरामदायी आणि सुरक्षित झाला आहे. परंतु या गाडीचे तिकीट दर हे इतर एक्सप्रेस गाड्यांच्या तुलनेत खूपच अधिक आहे. यामुळे ही गाडी देशातील सर्वसामान्य नागरिकांसाठी सुरू झाली नसून केवळ श्रीमंतांसाठी सुरू करण्यात आली आहे अशी टीका देखील अनेकांकडून केली जात आहे.
दरम्यान आता भारतीय रेल्वेने वंदे भारत एक्सप्रेस सारख्याच सुविधा असलेली मात्र तिकीट दर वंदे भारत पेक्षा कमी असलेली नवीन एक्सप्रेस गाडी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. आता भारतीय रेल्वे वंदे भारतची नवीन आवृत्ती सुरु करणार आहे. या नवीन गाडीला वंदे साधारण किंवा वंदे अंत्योदय असे नाव दिले जाणार असल्याचे सांगितले जात आहे.
तसेच या नवीन गाडीमुळे प्रवाशांना कमी पैशात प्रवास करता येणार असल्याचा दावा देखील केला जात आहे. त्यामुळे ही गाडी सर्वसामान्यांसाठी फायदेशीर ठरू शकते असे मत व्यक्त होत आहे. ही नव्याने सुरु होणारे गाडी वंदे भारत एक्सप्रेसच्या धरतीवर सुरू केली जाणार आहे.
मात्र ही गाडी नॉन एसी राहील आणि या गाडीचा वेग हा वंदे भारत एक्सप्रेस एवढा किंवा थोडा कमी राहणार आहे. ही गाडी द्वितीय श्रेणी अनारक्षित आणि द्वितीय श्रेणी 3-स्तरीय स्लीपर कोच असलेली नवीन एक्सप्रेस ट्रेन असेल. या नॉन एसी वंदे भारत सर्वसाधारण ट्रेनचे फोटो सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत. या गाडीची निर्मिती आयसीएफ चेन्नई या कोच फॅक्टरी मध्ये सुरू झाली आहे.
या प्रकारच्या एका ट्रेनची किंमत जवळपास 65 कोटी रुपये एवढी असल्याचा दावा केला जात आहे. दरम्यान ही गाडी या वर्षाच्या अखेरपर्यंत सुरू होऊ शकते असे देखील काही मीडिया रिपोर्ट मध्ये सांगितले गेले आहे. या ट्रेनमध्ये बायो-व्हॅक्यूम टॉयलेट, प्रवासी माहिती प्रणाली आणि प्रत्येक सीटवर चार्जिंग पॉइंट मिळेल अशी अपेक्षा आहे.
याशिवाय प्रवाशांच्या सुरक्षेसाठी प्रत्येक डब्यात सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जातील. तसेच वंदे भारत एक्स्प्रेस प्रमाणेच या ट्रेनमध्ये स्वयंचलित दरवाजा प्रणाली विकसित केली जाणार आहे. या वंदे साधारण ट्रेनमध्ये वंदे भारत एक्सप्रेस प्रमाणेच प्रवाशांना सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
यामुळे सर्वसामान्य प्रवाशांना देखील वंदे भारत एक्सप्रेसच्या सोयीसुविधा उपलब्ध होऊ शकणार आहेत. मात्र ही नवीन वंदे साधारण ट्रेन नॉन एसी राहणार आहे. या गाडीचा पहिला रेक येत्या सहा ते सात महिन्यात तयार होईल आणि यामध्ये 24 एल एच बी कोच बसवले जाणार आहेत.
एकंदरीत आगामी काही महिन्यात देशातील सर्वसामान्य प्रवाशांसाठी वंदे भारत एक्सप्रेस प्रमाणेच सोयीसुविधा असलेली वंदे साधारण ट्रेन सुरू होणार आहे. यामुळे आता ही नवीन गाडी केव्हा सुरू होते? याकडे संपूर्ण देश वासियांचे लक्ष लागून आहे.