Indian Railway News : मुंबईहून कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना दिलासा देण्यासाठी मध्य रेल्वेने एक मोठा निर्णय घेतला आहे. खरं पाहता उन्हाळी सुट्ट्या लक्षात घेता कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना अतिरिक्त गर्दीमुळे गाड्या उपलब्ध होत नाहीत.
अशा परिस्थितीत कोकणातील प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. मॅन प्रवाशांच्या या अडचणी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने तसेच कोकण रेल्वेने संयुक्तरीत्या वेगवेगळ्या मार्गावर काही विशेष गाड्या चालवण्याचे नियोजन केले आहे.
यामुळे कोकणवासीयांना मुंबईहून आपल्या गावी जाण्यासाठी मोठी मदत होणार आहे. या विशेष एक्सप्रेस ट्रेन मध्ये लोकमान्य टिळक टर्मिनस ते थिविम दरम्यान सुरू करण्यात आलेल्या स्पेशल ट्रेनचा देखील समावेश आहे.
मुंबई येथील एलटीटी म्हणजे लोकमान्य टिळक टर्मिनस ते थिविम दरम्यान ही गाडी मध्य रेल्वेने सुरू केली असून या गाडीसाठी आजपासून आरक्षण सुरू होणार आहे. दरम्यान आज आपण या एक्सप्रेस बाबत सविस्तर अशी माहिती थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
हे पण वाचा :- राजधानी मुंबईच्या वैभवात भर पडणार ! मरीन ड्राइव्हवर मुंबईकरांसाठी तयार होणार ‘या’ आंतरराष्ट्रीय सुविधा, पहा सरकारचा प्लॅन
केव्हा सुरू होणार ही स्पेशल ट्रेन
मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार लोकमान्य टिळक टर्मिनस तेथे थिविम दरम्यान सुरु करण्यात आलेली गाडी क्रमांक ०११२९ ची स्पेशल गाडी सहा मे ते तीन जून दरम्यान सुरू राहणार आहे. ही गाडी या कालावधीत दर शनिवारी, सोमवारी आणि बुधवारी धावणार आहे.
तसेच गाडी क्रमांक ०११३० म्हणजे थिविम ते एलटीटी अर्थात लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष रेल्वे ७ मे ते ४ जून दरम्यान चालवली जाणार आहे. ही गाडी दर रविवारी, मंगळवारी आणि गुरुवारी मध्य रेल्वेच्या माध्यमातून चालवली जाणार आहे.
हे पण वाचा :- मुंबई ते पुणे प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्वाची बातमी ! ‘या’ एक्सप्रेस ट्रेनला आता अतिरिक्त डबे जोडले जाणार, पहा…..
कसं राहणार वेळापत्रक?
हाती आलेल्या माहितीनुसार, गाडी क्रमांक ०११२९ एलटीटी ते थिविम लोकमान्य टिळक टर्मिनस येथून रात्री 10:15 मिनिटांनी ने केला आणि दुसऱ्या दिवशी 11:30 वाजता थिविम या ठिकाणी पोहोचणार आहे.
तसेच गाडी क्रमांक ०११३० थिविम ते एलटीटी विशेष रेल्वे थिविम येथील रेल्वे स्थानकावरून दुपारी ४.४० वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबईकडे रवाना होणार आहे. आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ४.०५ वाजता ही गाडी लोकमान्य टिळक टर्मिनस रेल्वे स्थानकावर पोहचणार आहे.
कुठं थांबणार ही गाडी?
मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार ही विशेष गाडी ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, अडावली, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि सावंतवाडी रोड या महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबणार आहे. निश्चितच या ट्रेनचा कोकणातील प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे.
हे पण वाचा :- शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ! येत्या खरीप हंगामात शेतकऱ्यांना स्वस्तात मिळणार डीएपी, वाचा सविस्तर