Indian Railway News : गेल्या काही दिवसांपासून रेल्वे प्रवाशांना अकराव्या वंदे भारत एक्सप्रेसची आतुरता लागली आहे. नेमकी ही 11वी ट्रेन कोणत्या मार्गावर धावेल याबाबत देखील प्रवासांमध्ये उत्सुकता आहे. जसं की आपणास ठाऊकच आहे की, सध्या देशात दहा वंदे भारत एक्सप्रेस गाड्या सुरू आहेत. देशभरातील वेगवेगळ्या मार्गावर या गाड्या सुरू असून आगामी वर्षभरात वंदे भारत एक्सप्रेस च्या गाड्यांची संख्या वाढणार आहे.
अशातच आता अकराव्या वंदे भारत एक्सप्रेस बाबत मोठी माहिती समोर आली आहे. न्यू दिल्ली ते भोपाल दरम्यान ही अकरावी वंदे भारत गाडी सुरू केली जाणार आहे. रानी कमलापति रेलवे स्टेशन ते दिल्ली या दरम्यान ही गाडी सुरू केली जाणार असल्याची माहिती भारतीय रेल्वेच्या माध्यमातून नुकतीच देण्यात आली आहे.
विशेष बाब अशी की या ट्रेनच्या लोकार्पणाची तारीखही समोर आली आहे. ही ट्रेन 1 एप्रिल 2023 रोजी सुरू केली जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या ट्रेनला एक एप्रिल रोजी सकाळी दहा वाजता हिरवा झेंडा दाखवणार आहेत.
हे पण वाचा :- शेतकऱ्यांनो, कांदा अनुदान मिळवायचे असेल तर 20 एप्रिलपर्यंत ‘हे’ काम करा; पणन महासंचालकांची माहिती
विशेष म्हणजे यासाठी तिकीट बुकिंग देखील उद्घाटनाच्या दिवशी म्हणजेच परवापासून सुरु होणार आहे. तसेच सर्वसामान्य प्रवाशांसाठी या ट्रेनचा लाभ तीन एप्रिलपासून मिळणार आहे. म्हणजेच तीन एप्रिल 2023 पासून या ट्रेनने प्रवास करता येणे प्रवाशांना शक्य बनणार आहे. दरम्यान या ट्रेनच्या तिकीट दराबाबत आणि वेळापत्रकाबाबत देखील एक मोठी माहिती हाती आली आहे.
हाती आलेल्या माहितीनुसार, भोपाळ ते दिल्ली दरम्यान धावणाऱ्या शताब्दी एक्स्प्रेसच्या तुलनेत वंदे भारतचे भाडे हे अधिक राहणार आहे. वास्तविक या रूट वरच नाही तर वंदे भारत एक्सप्रेसच्या इतरही रूटवर तिकीट दर इतर एक्सप्रेसच्या तुलनेत अधिक आहेत. गतिमान प्रवास आणि आरामदायी प्रवासामुळे ही ट्रेन निश्चितच लोकप्रिय बनली आहे, मात्र या ट्रेन साठी अधिक तिकीट आकारल जात असल्याने प्रवाशांमध्ये कुठे ना कुठे नाराजी देखील पाहायला मिळत आहे.
हे पण वाचा :- डोंबिवली, ठाणेकरांना आनंदाची बातमी! ‘हा’ बहुचर्चित पूल या दिवशी होणार खुला, आता Thane-Dombivali प्रवास मात्र 20 मिनिटात, पहा….
दरम्यान या नवीन अकराव्या वंदे भारत एक्सप्रेसच्या तिकीटबाबत बोलायचं झालं तर शताब्दी एक्सप्रेसच्या तुलनेत 10 ते 15 टक्के अधिक रक्कम तिकिटासाठी खर्च करावी लागणार आहे. रेल्वे अधिकाऱ्यांच्या मते, एसी चेअर कारचे भाडे 2000 पेक्षा थोडे जास्त असू शकते. तर एक्झिक्युटिव्ह क्लासचे भाडे अंदाजे 3300 रुपयांपर्यंत असू शकते. याबाबत मात्र अद्याप अधिकारीक माहिती हाती आलेली नाही.
तसेच भोपाल ते दिल्ली दरम्यान सुरू होणारी ही वंदे भारत एक्सप्रेस मात्र पावणेआठ तासात प्रवास करण्यास सक्षम राहणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. म्हणजेच शताब्दी एक्सप्रेस च्या तुलनेत अर्धा तास प्रवास या वंदे भारत एक्सप्रेसने जलद होणार आहे.
हे पण वाचा :- वंदे भारत एक्सप्रेस बाबत भारतीय रेल्वेने घेतला ‘हा’ मोठा निर्णय ! पहा संपूर्ण माहिती