Indian Railway News : भारतीय रेल्वेचा गेल्या काही वर्षात संपूर्ण चेहरा-मोहरा बदलला आहे. आता रेल्वे बोर्ड वंदे भारत ट्रेन मुळे चर्चेत आहे. या संपूर्ण स्वदेशी ट्रेनची देशात मोठी चर्चा रंगली असून अल्पावधीतच ही गाडी प्रवाशांच्या पसंतीस खरी उतरली आहे.
दरम्यान आता या वंदे भारत गाडीबाबत एक मोठी बातमी समोर येत आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी यासंदर्भात एक मोठी माहिती दिली आहे. खरं पाहता, देशभरात एकूण 10 वंदे भारत ट्रेन धावत आहेत. यापैकी चार वंदे भारत गाड्या आपल्या महाराष्ट्रात आहेत.
सी एस एम टी-शिर्डी, सीएसएमटी-सोलापूर, नागपूर बिलासपूर आणि मुंबई गांधीनगर यादरम्यान गाड्या राज्यात धावत आहेत. देशात 2019 मध्ये पहिली वंदे भारत एक्सप्रेस सुरू झाली होती. तेव्हापासून आत्तापर्यंत दहा वंदे भारत गाड्या देशभरातील वेगवेगळ्या रूटवर धावत आहेत. दरम्यान आगामी काही दिवसात राज्याला आणखी दोन वंदे भारत ट्रेनची भेट मिळण्याची शक्यता आहे.
हे पण वाचा :- मुंबईकरांना रेल्वे बोर्ड लवकरच देणार मोठी भेट ! शहरात अन उपनगरात आता ‘या’ वंदे भारत ट्रेन धावणार
रेल्वे बोर्डाकडून लवकरच पुणे सिकंदराबाद वंदे भारत ट्रेन सुरू होणार असल्याची माहिती काही मीडिया रिपोर्ट्स मध्ये देण्यात आली आहे. सोबतच केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी महाराष्ट्राची राजधानी आणि देशाची आर्थिक राजधानी मुंबई ते एक ग्लोबल पर्यटन स्थळ अर्थातच गोवा दरम्यान वंदे भारत ट्रेनची घोषणा केली आहे. दरम्यान आता केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिलेल्या माहितीनुसार, 2022 23 मध्ये वंदे भारत गाड्या बनवण्यासाठी १९४७९ कोटी रुपयांची तरतूद झाली आहे. यानुसार 102 वंदे भारत रेक म्हणजे कोचं तयार करण्याची योजना आहे.
2022 23 मध्ये 35 वंदे भारत रेक बनवले जातील आणि 2023 24 मध्ये 67 बनतील अशी माहिती त्यांनी दिली. यामध्ये 75 रेक हे चेअर कार कोचं अन उर्वरित स्लीपर कोच राहणार आहेत. एकंदरीत केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितल्याप्रमाणे आगामी काही दिवसात देशभरातील वेगवेगळ्या रूटवर वंदे भारत सुरु होणार आहेत.
म्हणून आता लवकरच महाराष्ट्राला पुणे सिकंदराबाद जी की सोलापूर मार्गे जाणार आहे या वंदे भारत गाडीची भेट मिळण्याची शक्यता आहे, याशिवाय रावसाहेब दानवे यांनी सांगितल्याप्रमाणे मुंबई ते गोवा दरम्यान देखील लवकरच वंदे भारत एक्सप्रेस धावू शकते अशी आशा आता बळावू लागली आहे.
हे पण वाचा :- आता राजधानी मुंबई ते कोल्हापूर दरम्यान धावणार वंदे भारत ट्रेन ?