Home Loan : अलीकडे घरांच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. परिणामी सर्वसामान्यांना हक्काच्या घरासाठी मोठी मेहनत घ्यावी लागत आहे. मात्र अलीकडे देशातील अनेक बँकांच्या माध्यमातून सर्वसामान्यांना घर निर्मितीसाठी कमी व्याजदरात गृह कर्ज पुरवले जात आहे. यामुळे अनेकांचे घर निर्मितीचे स्वप्न पूर्ण होत आहे.
विशेष बाब अशी की आता रियल इस्टेट क्षेत्रातील अनेक जाणकार लोक सर्वसामान्यांना गृह कर्ज घेऊन घर खरेदीचा सल्ला देत आहेत. गृह कर्ज घेऊन घर खरेदी करणे काहीअंशी फायदेशीर असल्याचे मत जाणकारांनी व्यक्त केले आहे.
मात्र असे असले तरी ज्या बँका कमी व्याजदरात कर्ज देत आहेत त्यांच्याकडूनच होम लोन घेतले पाहिजे जेणेकरून गृह कर्ज घेणे महाग पडणार नाही, असे जाणकारांनी स्पष्ट केले आहे.
अशा परिस्थितीत आज आपण एसबीआय बँकेकडून दिल्या जाणाऱ्या गृहकर्जाबाबत माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
खरंतर एसबीआय ही देशातील पब्लिक सेक्टर मधील सर्वात मोठी बँक आहे. या सरकारी बँकेकडून आपल्या ग्राहकांना परवडणाऱ्या दरात होम लोन उपलब्ध करून दिले जात आहे.
दरम्यान, आज आपण एसबीआय बँक होम लोन साठी किती व्याजदर आकारते आणि बँकेकडून तीस लाख रुपयांचे गृह कर्ज घेतले तर किती रुपये व्याज भरावे लागणार याविषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत.
एसबीआयचे Home Loan साठीचे व्याजदर
एसबीआय बँकेच्या माध्यमातून आपल्या नवीन ग्राहकांना किमान 8.40% व्याजदरात गृह कर्ज ऑफर केले जात आहे. मात्र हे व्याजदर सिबिल स्कोरच्या आधारावर ठरवले जात आहेत.
म्हणजे ज्यांचा सिबिल स्कोर चांगला असतो त्यांना कमी व्याजदरात होम लोन मिळते. ज्यांचा सिबिल स्कोर 750 पेक्षा अधिक आहे अशा व्यक्तींना बँकेकडून 8.40% या किमान व्याज दरात कर्ज उपलब्ध करून दिले जात आहे.
30 लाखाचे कर्ज घेतल्यास किती व्याज भरावे लागणार
एसबीआयच्या होम लोन कॅल्क्युलेटर नुसार, जर एखाद्या ग्राहकाने बँकेकडून 30 लाख रुपयांचे कर्ज 20 वर्षांच्या कालावधीसाठी घेतले तर त्याला 25 हजार 845 रुपयांचा मासिक हप्ता भरावा लागणार आहे.
म्हणजेच सदर कर्जदार व्यक्तीला या कालावधीत 32 लाख 2 हजार 832 रुपयांचे व्याज भरावे लागणार आहे. म्हणजेच तीस लाख रुपये कर्ज घेतलेल्या व्यक्तीला 62 लाख 2 हजार 832 रुपये भरावे लागणार आहेत.