Home Loan Interest Rate : प्रत्येकाच आपला स्वप्नातलं, हक्काच घर असावं असं स्वप्न असतं. परंतु महागाई ज्या पद्धतीने वाढत आहे तसेच घर घेण्याचे स्वप्न देखील महागले आहे. यामुळे घर घेण्यासाठी अनेकांना गृह कर्ज घ्यावे लागते. हे कर्ज घेताना मात्र त्यावरील व्याजदर सर्वसामान्यांना परवडणारा नसतो. परंतु काही बँकांच्या माध्यमातून व्याजदरात कटोती केली जात आहे.
विशेषता महिला कर्जदारांना व्याजदरात सवलत दिली जात आहे. महिलांचे रियल इस्टेट मध्ये गुंतवणूक वाढावी म्हणून अनेक बँका गृह कर्जावरील व्याजदरात महिलांना सूट देत आहेत. दरम्यान आज आपण कोणत्या बँकांच्या माध्यमातून महिलांना गृह कर्जावरील व्याजदरावर सूट दिली जात आहे याबाबत जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
हे पण वाचा :- पुणेकरांसाठी आनंदाची बातमी ! ‘या’ मार्गावर तयार होणार नवीन फ्लायओव्हर, 53 हजार कोटींची तरतूद; नितीन गडकरींची माहिती
या बँका महिलांना व्याजदरात देतात सूट
स्टेट बँक ऑफ इंडिया :- स्टेट बँक ऑफ इंडिया देशातील अग्रगण्य बँकांपैकी एक आहे. ही बँक देशातील सर्वात मोठी बँक म्हणून ओळखली जाते. या बँकेच्या माध्यमातून कायमच नागरिकांसाठी वेगवेगळ्या सोयी, सुविधा आणि योजना आणल्या जातात. दरम्यान एसबीआय महिलांना गृह कर्ज घेण्यासाठी प्रोत्साहित करत असून त्यांना गृह कर्जावरील व्याजदरात पाच बेस पॉइंट ची सवलत देत आहे. महिलांसाठी एसबीआय मध्ये गृह कर्जावरील व्याजदर 9.15 ते 10.15 दरम्यान आहे.
एचडीएफसी बँक :- ज्यांना गृह कर्ज घ्यायचे असेल ते एचडीएफसी बँकेतून देखील गृह कर्ज घेऊ शकतात. या बँकेच्या माध्यमातून देखील महिलांना गृहकर्जावर पाच बेस पॉईंट ची सवलत दिली जात आहे. या बँकेच्या माध्यमातून महिलांसाठी होमलोनवर 8.95 ते 9.85 दरम्यान व्याजदर आकारला जातो. हा व्याजदर क्रेडिट स्कोर आणि गृहकर्जाची रक्कम यावर ठरतो.
कॅनरा बँक :- या बँकेकडून देखील महिलांना गृह कर्ज घेण्यासाठी प्रोत्साहन दिले जात आहे. ही बँक देखील एचडीएफसी बँक आणि स्टेट बँक ऑफ इंडिया प्रमाणे महिलांना गृह कर्जावरील व्याजदरात पाच बेस पॉइंटची सवलत या ठिकाणी देत आहे. या बँकेमध्ये महिलांसाठी होम लोन वरील व्याजदर 8.85% पासून सुरू होत आहे.
युनियन बँक ऑफ इंडिया :- या बँकेकडून देखील महिलांना गृह कर्ज घेण्यासाठी प्रोत्साहन म्हणून पाच बेस पॉइंटची सवलत दिली जात आहे. ही बँक सद्यास्थितीला लागू असलेल्या व्याज दारात 0.05% इतकी सवलत महिलांना देते. निश्चितच ज्यांना होम लोन ची गरज आहे असे व्यक्ती युनियन बँक ऑफ इंडिया चा विचार करू शकतात.
हे पण वाचा :- मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! आता ‘त्या’ मार्गावरही धावणार बेस्टची ई-डबल डेकर बस; ‘या’ दिवशी सुरु होणार सेवा