HDFC Home Loan : प्रत्येकाचं हक्काच घर असावं असं स्वप्न असतं. साहजिकच घर बांधणे काही सोपे नाही. त्यासाठी मोठ्या प्रमाणात अर्थार्जण लागतं. आता प्रत्येकाची काही एवढी मोठी सेविंग नसते की सेविंगच्या पैशांमधून घर उभारणी होऊ शकेल. परिणामी, आपल्यापैकी अनेक लोक गृह कर्ज घेण्याचा विचार करतात. विशेष म्हणजे सर्वसामान्यांच्या घराच्या स्वप्नांसाठी बँका देखील पुढाकार घेतात.
प्रत्येकाचं हक्काचं घर असावे यासाठी वेगवेगळ्या वित्तीय संस्था, बँका कमी व्याजदरात गृह कर्ज उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करत असतात. ग्राहकांसाठी वेगवेगळ्या ऑफर्स ठेवतात. दरम्यान आज आपण एचडीएफसी बँकेकडून जर गृह कर्ज घ्यायचं असेल तर गृह कर्ज मिळवण्याची झटपट पद्धत जाणून घेणार आहोत. खरं पाहता एचडीएफसी बँकेने तात्काळ गृह कर्ज योजना आणली आहे. या योजनेच्या माध्यमातून 2 मिनिटातच पात्र लाभार्थ्यांना गृह कर्ज मंजूर केल जात.
हे पण वाचा :- मोठी बातमी ! कांदा उत्पादकांना क्विंटलमागे मिळणार ‘इतकं’ अनुदान; ‘या’ दिवशी जाहीर होणार अनुदान, वाचा सविस्तर
परंतु असे असले तरी पात्र लाभार्थ्यांना कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी तसेच त्या कागदपत्रांची पडताळणी करण्यासाठी ठराविक कालावधी हा लागत असतो. विशेष म्हणजे एचडीएफसी बँकेच्या माध्यमातून दिल जाणार हे तात्काळ गृहकर्ज प्राप्तीसाठी व्हाट्सअप च्या माध्यमातून अर्ज सादर होतो. विशेष म्हणजे व्हाट्सअपवरच संबंधित व्यक्तीला तुम्ही गृहकर्तासाठी पात्र आहात की नाही याची कल्पना दिली जाते आणि गृह कर्ज मंजुरीचे प्रमाणपत्र देखील व्हाट्सअप वरच मिळून जात.
मात्र असे असले तरी ही योजना केवळ पगारदार व्यक्तींसाठी आहे. त्यामुळे सेल्फ एम्प्लॉयमेंट किंवा शेतकऱ्यांसाठी या तात्काळ गृह कर्ज अंतर्गत कर्ज मिळत नाही. पण बँकेच्या माध्यमातून वेगवेगळ्या गृहकर्जाच्या योजना सुरू आहेत त्यामध्ये सेल्फएम्प्लॉइड किंवा इतर व्यक्ती अर्ज करू शकणार आहेत. दरम्यान आज आपण तात्काळ गृह कर्ज योजनेसाठी व्हाट्सअप वर कशा पद्धतीने अर्ज करावा लागतो किंवा काय प्रोसेस आहे याविषयी जाणून घेणार आहोत.
जर तुम्ही पगारदार असाल आणि एचडीएफसी बँकेच्या या तात्काळ गृहकर्जासाठी अप्लाय करू इच्छित असाल तर सर्वप्रथम आपल्या व्हाट्सअप वरून + 91 98670 00000 या नंबर वर HI असा मेसेज टाका.
हा मेसेज सेंड केला की तुमची गृह कर्जाची प्रक्रिया प्रारंभ होते.
ही प्रक्रिया सुरू झाली की मेन्यू मधून नवीन कर्ज हा पर्याय निवडा.
यानंतर उत्पन्न गटातून पगारदार हा पर्याय निवडा.
यानंतर तुमचं नागरिकत्व निवडा म्हणजेच भारतीय आहात की परदेशी याबाबत लिहा.
यानंतर तुम्हाला पिन कोड टाकावा लागणार आहे.
यानंतर तुम्हाला तुमचे नाव लिहावे लागणार आहे. नाव लिहिताना पॅन कार्ड वर जे नाव असेल तेच नाव लिहिणे मात्र अपेक्षित आहे.
यानंतर तुम्हाला बँकेच्या अटी व शर्ती मान्य कराव्या लागतील.
यानंतर तुम्ही भरलेली संपूर्ण माहिती तुमच्या पुढ्यात येईल. ही माहिती मात्र काळजीपूर्वक तुम्हाला वाचायची आहे आणि खात्री करायची आहे. म्हणजेच कन्फर्म करायच आहे.
यानंतर तुमच्या मोबाईल नंबर वर ओटीपी प्राप्त होणार आहे. तो ओटीपी सांगितलेल्या ठिकाणी प्रविष्ट करा.
यानंतर तुमच्या पगारासंदर्भात माहिती त्या ठिकाणी भरावी लागणार आहे. यासोबतच जर तुम्ही एखाद कर्ज घेतलं असेल आणि त्याचे ईएमआय सुरू असतील तर त्या संदर्भात माहिती द्यावी लागणार आहे.
ही माहिती व्यवस्थित रीत्या भरल्यानंतर आणि तुम्ही गृह कर्जासाठी पात्र असल्यास तुम्हाला तात्काळ तात्पुरते गृह कर्ज मंजुरीचे प्रमाणपत्र मिळून जाणार आहे. हे प्रमाणपत्र पीडीएफ स्वरूपात राहणार आहे.
ही प्रक्रिया झाल्यानंतर बँक तुमच्याशी मात्र संपर्क साधेल. यानंतर तुम्हाला बँकेच्या माध्यमातून सर्व कागदपत्रे सादर करण्यास सांगितले जाईल. कागदपत्रे सादर झाल्यानंतर अन सादर केलेली कागदपत्रे आणि तुमची पात्रता यथायोग्य असल्यास तुम्हाला एच डी एफ सी बँकेच्या माध्यमातून गृहकर्ज मिळणार आहे.
हे पण वाचा :- aअहमदनगर, पुणे, नाशिक, सातारा, विदर्भ, खानदेश, औरंगाबाद, जालना, हिंगोली या जिल्ह्यात एवढे दिवस पाऊस पडणार अन गारपीट…!