HDFC Bank FD Rate : पीएसबी अर्थातच पब्लिक सेक्टर बँकेत एसबीआय मोठी बँक म्हणून ओळखली जाते त्याचप्रमाणे एचडीएफसी बँक प्रायव्हेट सेक्टर मधील सर्वात मोठी बँक आहे. एचडीएफसी ही देशातील प्रायव्हेट सेक्टरमधील सर्वात मोठी बँक असून ही बँक एसबीआय प्रमाणेच देशातील सर्वाधिक सुरक्षित बँकेच्या यादीत येते.
बँकेच्या माध्यमातून आपल्या करोडो ग्राहकांसाठी नेहमीच वेगवेगळे निर्णय देखील घेतले जातात. बँकेकडून आपल्या ग्राहकांना परवडणाऱ्या दरात गृह कर्ज, शैक्षणिक कर्ज, व्यावसायिक कर्ज, वैयक्तिक कर्ज, सुवर्ण कर्ज ऑफर केले जात आहे.
याशिवाय बँक एफडी करणाऱ्या गुंतवणूकदारांना देखील चांगला परतावा देत आहे. अशातच एचडीएफसी बँकेने नुकताच एक मोठा निर्णय घेतला आहे. बँकेने एफडीचे व्याजदर वाढवण्याचे जाहीर केले आहे.
बल्क एफडीवरील व्याज एचडीएफसीने वाढवले आहेत. म्हणजेच दोन कोटी रुपयांपासून ते 5 कोटी रुपयांपर्यंत FD करणाऱ्यांना करणाऱ्यांना या वाढीव व्याजदराचा फायदा मिळणार आहे. बँकेकडून सात दिवसांपासून ते दहा वर्षांपर्यंत FD ऑफर केली जात आहे.
मात्र, बँकेने फक्त एक वर्षांपासून ते 15 महिन्याच्या कालावधी मधील बल्क एफडी वरील व्याजदर वाढवले आहे. 3 फेब्रुवारी 2024 पासून या वाढीव व्याजदराची अंमलबजावणी सुरू झाली आहे.
एक वर्षापासून ते 15 महिन्यांच्या कालावधीमधील बल्क एफडीच्या म्हणजे 2 कोटी पासून ते 5 कोटी पर्यंतच्या FD व्याजदरात वाढ करण्यात आली असल्याने याचा गुंतवणूकदारांना फायदा मिळणार आहे.
दरम्यान आता आपण 2 कोटी पासून ते 5 कोटी पर्यंतच्या एफडी करिता बँकेकडून किती व्याजदर ऑफर केले जात आहे याविषयी जाणून घेणार आहोत.
नवीन व्याजदर कसे आहेत ?
एचडीएफसी बँकेकडून सर्वसामान्य नागरिकांना विविध कालावधीच्या अन दोन कोटी पासून ते पाच कोटींपर्यंतच्या एफडीसाठी 4.75% ते 7.40% यादरम्यान व्याज ऑफर केले जात आहे.
दुसरीकडे जेष्ठ नागरिकांना 0.50% अधिकचे व्याजदर बँकेकडून दिले जात आहे. म्हणजेच एचडीएफसी बँकेकडून ज्येष्ठ नागरिकांना 5.25% ते 7.90% यादरम्यान व्याज ऑफर केले जात आहे.
हे व्याज बल्क एफडी साठी म्हणजेच दोन कोटी ते पाच कोटी रुपयांचा एफडी साठी लागू राहणार आहे. तसेच हे व्याजदर 3 फेब्रुवारी 2024 पासून लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे मोठी रक्कम एफडीमध्ये गुंतवणाऱ्या गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळणार आहे.