Havaman Andaj : गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रात अवकाळी पावसाचे संकट पाहायाला मिळत आहे. सातत्याने होत असलेला अवकाळी पाऊस आणि गारपीट रब्बी हंगामातील पिकांचे मोठे नुकसान करत आहे. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
गेल्या काही दिवसांपासून मात्र अवकाळी पावसाने आणि गारपिटीने विश्रांती घेतलेली आहे. यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना आता दिलासा मिळाला आहे.
पण अशातच हवामान तज्ञांनी 10 मार्च ते 14 मार्च दरम्यान महाराष्ट्रातील हवामान कसे राहणार ? या कालावधीत पाऊस तथा गारपीटीची शक्यता आहे का या संदर्भात नुकतीच एक मोठी अपडेट दिली आहे. आज आपण हवामान तज्ञांचा हा अंदाज थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
जेष्ठ हवामान तज्ञ माणिकराव खुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईसह संपूर्ण कोकण, खानदेशसह संपूर्ण उत्तर महाराष्ट्र आणि पुणे, कोल्हापूर, सातारा या 15 जिल्ह्यांमध्ये पहाटेच्या वेळी गारवा जाणवत आहे.
या जिल्ह्यांमध्ये अजूनही पहाटे थंडी पडतेय. यामुळे येथील रब्बी हंगामातील गहू आणि हरभरा पिकाला याचा फायदा होत आहे.
दुसरीकडे राज्यातील कमाल तापमान 29 ते 37 अंश दरम्यान नोंदवले जात आहे. त्यामुळे दुपारनंतर वातावरणात उबदारपणा पाहायला मिळतोय. यामुळे उन्हाळ्याची चाहूल देखील भासू लागली आहे.
अशा या परिस्थितीमध्ये मात्र जम्मू काश्मिर, लेह-लडाख, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड या भागांमध्ये दहा ते 14 मार्च दरम्यान वारा वीज, गडगडाटीसह पाऊस, बर्फबारी व थंडी जाणवेल असा अंदाज खुळे यांनी यावेळी वर्तवला आहे.
यामुळे या सदर कालावधीमध्ये अर्थातच 10 ते 14 मार्च दरम्यानच्या पाच दिवसात महाराष्ट्रात कसे हवामान राहणार हे देखील जाणून घेणे आवश्यक आहे.
दरम्यान माणिकराव खुळे यांनी या कालावधीमध्ये अर्थातच 10 ते 14 मार्च दरम्यान आपल्या राज्यातील हवामान कोरडे राहून केवळ पहाटेची थंडी फक्त जाणवणार असल्याची मोठी माहिती यावेळी दिली आहे.
पण, पाऊस अथवा गारपीटीची कोणतीही शक्यता महाराष्ट्रात नाहीये. त्यामुळे शेतकऱ्यांनी चिंता करू नये असे आवाहन जाणकारांनी केले आहे.