Havaman Andaj : राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक मोठी अपडेट आहे. खरंतर ही शेतकऱ्यांसाठी चिंतेची बातमी करणार आहे. सध्या रब्बी हंगामातील गहू, हरभरा, कांदा यांसारखी सर्वच पिके वाढीच्या अवस्थेत आहेत.
मध्यंतरी रब्बी हंगामातील पिकांना अवकाळी पावसाचा फटका बसला होता. गेल्या वर्षी नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे अन या नव्या वर्षाच्या सुरुवातीला झालेल्या पावसामुळे रब्बी हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले.
गेल्या काही दिवसांपासून मात्र महाराष्ट्रातील हवामान कोरडे आहे. आता मात्र पुन्हा एकदा राज्यातील हवामानात मोठा बदल होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात पुन्हा अवकाळी पाऊस बरसणार असा अंदाज वर्तवला जात आहे.
ज्येष्ठ हवामान अभ्यासक, हवामान खात्यातील निवृत्त हवामान शास्त्रज्ञ माणिकराव खुळे यांनी राज्यातील पावसासंदर्भात मोठी माहिती दिली आहे. खुळे यांनी महाराष्ट्रात पुन्हा एकदा अवकाळी पाऊस बरसणार असे म्हटले आहे.
केव्हा सुरु होणार अवकाळी ?
माणिकराव खुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात येत्या दोन दिवसांनी अर्थातच 9 फेब्रुवारीपासून पुन्हा एकदा अवकाळी पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे.
9 फेब्रुवारीपासून ते 12 फेब्रुवारी पर्यंत महाराष्ट्रात काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस बरसणार आहे. या कालावधीत राज्यातील मराठवाडा आणि विदर्भ विभागात व काही पावसाचा अंदाज देण्यात आला आहे.
खुळे यांनी म्हटल्याप्रमाणे या कालावधीत राज्यातील संपूर्ण विदर्भ विभागात ढगाळ वातावरणासहित तुरळक ठिकाणी ढगांच्या गडगडाटीसह मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
विदर्भ विभागातील नागपूर, भंडारा, वर्धा, यवतमाळ, वाशीम या 5 जिल्ह्यांमध्ये 10 आणि 11 फेब्रुवारीला पावसाची शक्यता अधिक राहणार आहे.
दुसरीकडे मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये फक्त ढगाळ वातावरण राहणार आहे. नांदेड, हिंगोली, परभणी या तीन जिल्ह्यांमध्ये मात्र तुरळक ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
यामुळे आता माणिकराव खुळे यांनी वर्तवलेला हा हवामान अंदाज खरा ठरणार का हे विशेष पाहण्यासारखे राहणार आहे.