Havaman Andaj : महाराष्ट्रात गेल्या बारा-तेरा दिवसांपासून अवकाळी पाऊस सुरू आहे. अवकाळी पावसामुळे उन्हाने व्याकुळ झालेल्या जनतेला काहीसा दिलासा मिळाला आहे. प्रचंड तापमानामुळे होणारी अंगाची लाहीलाही काही प्रमाणात कमी झाली आहे. पण, या अवकाळी पावसाचा शेती क्षेत्राला मोठा फटका बसला आहे.
शेतकऱ्यांच्या शेती पिकांना या वादळी पावसाचा मोठा फटका बसला असून अखेर हा वादळी पाऊस केव्हा थांबणार ? हाच मोठा संवाल शेतकऱ्यांच्या माध्यमातून उपस्थित केला जात आहे. अशातच राज्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे.
हवामान खात्याने येत्या काही तासात महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार असा अंदाज व्यक्त केला आहे. महाराष्ट्रात पुन्हा एकदा वादळी पावसाची जोरदार बॅटिंग होण्याची शक्यता आहे.
हवामान खात्याने म्हटल्याप्रमाणे आगामी तीन ते चार तास महाराष्ट्रासाठी विशेष महत्त्वाचे आहेत. कारण की येत्या तीन-चार तासात राज्यातील नऊ जिल्ह्यांमध्ये तुफान पाऊस होणार असा अंदाज आहे.
भारतीय हवामान खात्याने म्हटल्याप्रमाणे येत्या तीन ते चार तासात राज्यातील मध्य महाराष्ट्र विभागातील अहमदनगर, जळगाव, नाशिक, कोल्हापूर, सातारा, कोकणातील रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग आणि मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यात तुफान पाऊस होण्याची शक्यता आहे.
आय एम डी ने आज आणि उद्या राज्यात पाऊस हजेरी लावणार असे म्हटले आहे. खरतर 19 मेला अंदमानात मान्सूनचे आगमन झाले आहे. आता मान्सूनची पुढील वाटचाल देखील सुरू झाली आहे. ये
सांत दक्षिण-पूर्व अरबी समुद्रासह मालदीवच्या काही भागात मान्सून पोहचणार अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. मान्सूनसाठी अशीच अनुकूल परिस्थिती राहिली तर आगामी काही तासात मान्सून दक्षिण बंगालचा उपसागर, अंदमान आणि निकोबार बेटांतील काही भागांमध्ये पोहचणार आहे.
दरम्यान, सध्या मान्सूनची प्रगती वेगाने होत असल्याने देशभरातील अनेक राज्यांमध्ये पावसाचं वातावरण तयार झालं आहे. आपल्या महाराष्ट्रात देखील याच कारणाने आज आणि उद्या काही भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.