Havaman Andaj : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात वादळी पावसासाठी पोषक परिस्थिती तयार होत आहे. राज्यातील विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाची हजेरी लागली आहे. यामुळे मध्य महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रातील कांदा पिकाला मोठा फटका बसला आहे दुसरीकडे विदर्भातील आणि मराठवाड्यातील काही भागांमध्ये हळद, गहू हरभरा अशा पिकांची हार्वेस्टिंगची कामे सुरू असून या पिकाचे देखील वादळी पावसाने मोठे नुकसान झाले आहे.
फळबागेचे देखील नुकसान झाले आहे. विशेष म्हणजे विदर्भात मराठवाड्यातील काही भागात गारपीट झाल्याची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार राज्यातील सोलापूर, परभणी, लातूर, बीड, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, वर्धा, गोंदिया, चंद्रपूर जिल्ह्यात गुरुवारी अर्थातच 11 तारखेला वादळी वारे, विजांसह पाऊस पडला आहे.
तसेच यातील काही जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी गारपीट झाल्याची माहिती हाती आली आहे. वादळी पावसामुळे महाराष्ट्रातील अनेक भागात उन्हाचे चटके कमी झाले आहेत. पण उकाडा मात्र कायम असल्याचे चित्र पाहायला मिळतय.
यामुळे वादळी पाऊस होऊनहीं नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळालेला नाही. दरम्यान आज देखील राज्यात पावसाची शक्यता कायम असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने दिला आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार आज राज्यातील 19 जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता काय राहणार आहे. यामुळे निश्चितच शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार अशी भीती व्यक्त होत आहे.
हवामान खात्याने सौराष्ट्र आणि परिसरावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती तयार झाली असून यामुळे मध्य महाराष्ट्र, दक्षिण कर्नाटकपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाला असल्याचे म्हटले आहे. हेच कारण आहे की सध्या राज्यावर अवकाळी पावसाचे ढग आहेत.
दरम्यान आज राज्यातील मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाडा विभागातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. परंतु कोकणासह उर्वरित राज्यात फक्त ढगाळ हवामान राहील अन उन्हाचा चटका कायम राहील असे आयएमडीने आपल्या निवेदनात स्पष्ट केले आहे.
IMD ने राज्यातील सोलापूर, जालना, बीड, धाराशिव, लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड, बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये वादळी पाऊस बरसणार असे म्हटले असून या पार्श्वभूमीवर या सदर 19 जिल्ह्यांना आजसाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. यामुळे या संबंधित जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आपल्या शेती पिकांची विशेष काळजी घ्यावी लागणार आहे.