Havaman Andaj : गेल्या अनेक दिवसांच्या खंडानंतर सप्टेंबर महिन्यात पावसाने पुनरागमन केले होते. ऑगस्ट महिन्यात जवळपास 20 ते 25 दिवस विश्रांती घेतल्यानंतर सप्टेंबर महिन्याच्या अगदी सुरुवातीलाच पावसाने जोरदार कमबॅक केला. यामुळे सर्वत्र समाधानाचे वातावरण तयार झाले आहे. सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात राज्यातील काही भागात पावसाला सुरुवात झाली.
मात्र पावसाचा जोर वाढला तो सात सप्टेंबर नंतर. 7 सप्टेंबर ते 10 सप्टेंबर पर्यंत राज्यातील वेगवेगळ्या भागात जोरदार पाऊस झाला. काल जरूर राज्यातील काही भागातून पावसाने काढता पाय घेतला. मात्र सात ते नऊ सप्टेंबर हे तीन दिवस राज्यातील बहुतांशी भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस झाला. यामुळे राज्यातील शेतकऱ्यांमध्ये सर्वत्र समाधानाचे वातावरण पाहायला मिळत होते.
अशातच मात्र पावसासंदर्भात एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे आज पासून राज्यात पावसाचा जोर कमी होणार आहे. 11 सप्टेंबर पासून राज्यातुन पावसाचा जोर कमी होणार असून 13 सप्टेंबर पर्यंत अशीच परिस्थिती राहणार असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. आज महाराष्ट्रातील कोणत्याच जिल्ह्याला पावसाचा अलर्ट जारी करण्यात आलेला नाही.
आज संपूर्ण महाराष्ट्राला ग्रीन अलर्ट आहे. म्हणजेच आज पावसाची शक्यता नाही. यामुळे आता किती दिवस पाऊस विश्रांती घेणार हा मोठा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. दरम्यान भारतीय हवामान विभागाने आणखी दोन दिवस महाराष्ट्रात पाऊस पडणार नसल्याचे सांगितले असे. आय एम डी ने सांगितल्याप्रमाणे आज सोमवार आणि उद्या मंगळवारी राज्यात पाऊस पडणार नाही. हे दोन दिवस पावसाची उघडीप राहणार आहे.
मात्र बुधवारपासून पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामानाने भागाने व्यक्त केली आहे. अर्थातच 13 सप्टेंबर पासून राज्यात पावसाचा जोर वाढणार असा अंदाज आहे. बुधवारी आणि गुरुवारी अर्थातच 13 आणि 14 सप्टेंबर रोजी राज्यातील विदर्भ विभागातील बहुतांशी भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
या पार्श्वभूमीवर संबंधित विभागाला येलो अलर्ट देखील जारी करण्यात आला आहे. एकंदरीत पाऊस थोडा काळ विश्रांती घेणार आहे. यानंतर पुन्हा एकदा पावसाचे आगमन होणार आहे. यंदा 14 सप्टेंबरला बैलपोळा आहे, त्यापूर्वीच अर्थातच 13 सप्टेंबरलाच पावसाचे पुन्हा एकदा आगमन होण्याची शक्यता आहे. यामुळे सालाबादाप्रमाणे याहीवर्षी बैलपोळ्याला जोरदार पाऊस पडू शकतो असे शेतकऱ्यांना वाटतं आहे.