Havaman Andaj : गेल्या काही दिवसांमध्ये राज्यातील अनेक भागातील किमान तापमानातं घट झाली आहे. आता राज्यात कडाक्याच्या थंडीला सुरुवात होत आहे. 15 ते 17 नोव्हेंबर दरम्यान राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पाऊस झाला होता. त्यावेळी सुद्धा थंडीची तीव्रता कमी झाली होती. पण आता पुन्हा एकदा थंडीची तीव्रता वाढत आहे.
राज्यातील अनेक भागांमध्ये कडाक्याच्या थंडीला सुरुवात झाली असून भारतीय हवामान खात्याने नुकताच एक नवीन अंदाज जाहीर केला आहे. या नवीन अंदाजात हवामान खात्याने राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये नोव्हेंबर च्या शेवटी पाऊस पडू शकतो असे म्हटले आहे.
खरेतर गेल्या रविवारपासून महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये कडाक्याच्या थंडीला सुरुवात झाली आहे. दरम्यान कडाक्याच्या थंडीला सुरुवात होत नाही तोच महाराष्ट्रातील हवामानात बदल झाला आहे. जेष्ठ हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी एक डिसेंबर पासून महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाची शक्यता वर्तवली आहे.
एक डिसेंबर ते 4 डिसेंबर दरम्यान राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. पंजाबरावांनी सांगितल्याप्रमाणे दरवर्षी 2 डिसेंबर ते 7 डिसेंबर दरम्यान पाऊस होत असतो. या काळात दरवर्षी अवकाळी पाऊस होतो यानुसार यंदाही या काळात पावसाचा अंदाज देण्यात आला आहे.
एक डिसेंबर पासून ते चार डिसेंबर पर्यंत राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असूनही अनुषंगाने शेतकऱ्यांनी आपल्या शेती पिकांची काळजी घ्यावी असेही पंजाब रावांनी म्हटले आहे.
दुसरीकडे हवामान खात्याचे निवृत्त शास्त्रज्ञ माणिकराव खुळे यांनी सुद्धा 27 नोव्हेंबर पासून महाराष्ट्रात पावसाला सुरुवात होणार असे म्हटले आहे. 27 ते 30 नोव्हेंबर दरम्यान राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
अर्थातच आणखी एक आठवडा महाराष्ट्रातील हवामान कोरडे राहील आणि कडाक्याची थंडी सुरूच राहणार आहे पण आठवड्यानंतर राज्यात पावसाला सुरुवात होणार आहे. 27 ते 30 नोव्हेंबर दरम्यान राज्यातील अनेक भागांमध्ये ढगाळ हवामान राहणार असून अगदीच तुरळक ठिकाणी झालाच तरी अगदीच किरकोळ स्वरूपाचा पाऊस पडेल असा अंदाज खुळे यांनी यावेळी वर्तवला आहे.
२७ ते ३० नोव्हेंबर दरम्यान पुणे, नगर, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, धाराशिव, लातूर आणि नांदेड अशा नऊ जिल्ह्यांत ढगाळ वातावरण राहणार असा अंदाज आहे. अगदीच तुरळक ठिकाणी झालाच तर किरकोळ पावसाची शक्यता आहे. त्यामुळे या नऊ जिल्ह्यांत चार दिवसांत म्हणजे २७ ते ३० नोव्हेंबर दरम्यान थंडीला काहीसा विराम मिळू शकतो.