Havaman Andaj September : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आणि सर्वसामान्य जनतेसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे महाराष्ट्रात पुन्हा एकदा मान्सून सक्रिय झाला आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला असल्याने राज्यात पुन्हा एकदा पावसासाठी पोषक हवामान तयार होत आहे.
यामुळे राज्यात उद्यापासून काही भागात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाच्या माध्यमातून वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, उद्या 13 सप्टेंबर 2023 रोजी पुन्हा एकदा मान्सून सक्रिय होणार आहे. सुरवातीला मान्सूनची सक्रियता विदर्भात पाहायला मिळणार आहे.
याचाच अर्थ उद्या विदर्भात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. यानंतर मग पुढे 48 तासानंतर मान्सून राज्यातील इतर भागात सक्रिय होणार असल्याचे सांगितले जात आहे. खरंतर सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात पावसाचा जोर वाढला होता. सात सप्टेंबर ते 9 सप्टेंबर दरम्यान राज्यातील वेगवेगळ्या भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची नोंद झाली.
यामुळे ऑगस्ट महिन्यातील पावसाची तूट सप्टेंबर महिन्यातून भरून निघेल अशी आशा शेतकऱ्यांना वाटत होती. पण गेल्या दोन दिवसांपासून अचानक पावसाचा जोर कमी झाला. यामुळे आता राज्यात पुन्हा एकदा पावसाचा खंड पडतो की काय अशी भीती शेतकऱ्यांना वाटू लागली आहे. पण शेतकऱ्यांसाठी एक अतिशय दिलासादायक बातमी समोर येत आहे.
ती म्हणजे राज्यात उद्यापासून पुन्हा एकदा मान्सून सक्रिय होणार आहे. उद्या बुधवारी राज्यातील विदर्भ विभागात हलका ते मध्यम पावसाला सुरुवात होणार असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. तसेच गुरुवारपासून विदर्भासह कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे.
याशिवाय, शुक्रवारपासून संपूर्ण राज्यात पावसाचा जोर वाढणार असल्याचे बोलले जात आहे. त्यानंतर पुन्हा १७ ते १९ आणि पुढे १९ ते २३ सप्टेंबर पर्यंत पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. निश्चितच, राज्यात आता पुन्हा एकदा मान्सून सक्रिय होणार असल्याने राज्यातील शेतकऱ्यांना यामुळे पुन्हा एकदा दिलासा मिळणार आहे.
दरम्यान यावर्षी 19 सप्टेंबरला गणेशोत्सवास सुरुवात होत आहे. १९ सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थी आहे याच दिवसापासून गणेशोत्सवाला सुरुवात होणार आहे. यामुळे यंदा गणेशोत्सवाच्या सुरुवातीस महाराष्ट्रात चांगला पाऊस पडेल असे चित्र तयार होत आहे. आयएमडीने दिलेल्या माहितीनुसार, विदर्भात 13 तारखेपासून पावसाला सुरुवात होणार आहे.
मात्र 14 ते 17 दरम्यान विदर्भात जोरदार पावसाची शक्यता आहे. कोकणात, मध्य महाराष्ट्रात 15 तारखेपासून पुन्हा एकदा पावसाला सुरुवात होणार आहे. तसेच मराठवाड्यात 16 तारखेपासून पावसाला सुरुवात होणार आहे. पुणे, नाशिक आणि सातारा जिल्ह्यातील घाटमाथ्यावर 16 आणि 17 तारखेला जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.