Havaman Andaj : भारतीय हवामान खात्याने काही भागात पुन्हा एकदा मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार येत्या 48 तासात काही भागांमध्ये हाड गोठवणारी थंडी पडणार आहे तर काही ठिकाणी अति मुसळधार पावसाची शक्यता आहे.
देशातील अनेक भागांमध्ये गेल्या काही दिवसांपासून कडाक्याची थंडी पडत आहे. रात्यातही थंडीचे प्रमाण वाढले आहे. महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र विदर्भ आणि मराठवाड्यात अक्षरशा हाड गोठवणारी थंडी पडत आहे.
महाराष्ट्रातील धुळे आणि नाशिक या दोन कमाल आणि किमान तापमानात मोठ्या प्रमाणात घट आलेली आहे. या जिल्ह्यातील नागरिक दिवसभर स्वेटर घालून आहेत. पण, एकीकडे थंडीचं संकट असतानाच आता हवामान विभागाकडून एक नवीन अंदाज समोर आला आहे.
IMD ने देशातील अनेक राज्यांमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा दिलाय. मन्नारच्या खाडी परिसरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असून त्यामुळे देशातील काही राज्यांमध्ये पावसाची शक्यता तयार होत आहे.
येत्या 24 तासात मन्नारच्या खाडी परिसरात तयार झालेला कमी दाबाचा पट्टा पश्चिमेकडे सरकणार असून त्यामुळे पुढील 24 तासांत दक्षिण अंदमानच्या समुद्रात चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता आहे.
या चक्रीवादळामुळे पुढील 48 तासांमध्ये दक्षिण भारतातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाच्या शास्त्रज्ञांनी वर्तवली आहे. आता आपण भारतीय हवामान खात्याने कोणत्या राज्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवली आहे या संदर्भात माहिती पाहणार आहोत.
कुठे बरसणार अति मुसळधार पाऊस
हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, दक्षिण भारतातील राज्यांमध्ये येत्या 48 तासात अतिमुसळधार पाऊस पडणार अशी शक्यता आहे. यात तामिळनाडू, आंध्र प्रदेश, केरळ, कर्नाटक आणि पाँडेचेरीमध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
या अनुषंगाने या संबंधित राज्यांमध्ये नागरिकांनी सावध राहावे असा सल्ला देण्यात आला आहे. आपल्या महाराष्ट्राबाबत बोलायचं झाल्यास महाराष्ट्रात कोणताही पावसाचा इशारा देण्यात आलेला नाही, मात्र राज्यातील अनेक भागांमध्ये कडाक्याची थंडी पडण्याची शक्यता आहे.
खरे तर बंगालच्या उपसागरात नुकत्याच काही दिवसांपूर्वी एका चक्रीवादळाची निर्मिती झाली होती आणि या चक्रीवादळाच्या प्रभावामुळे महाराष्ट्रातही पावसाने दणका दिला होता.
फेंगल नावाच्या चक्रीवादळामुळे दक्षिण भारतातील अनेक राज्यांमध्ये पाऊस झाला आणि याचा प्रभाव आपल्या महाराष्ट्रातही पाहायला मिळाला. दरम्यान आता पुन्हा एकदा दक्षिण भारतात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असल्याने महाराष्ट्रातही पाऊस पडणार की काय अशी भीती शेतकऱ्यांना आहे.