Havaman Andaj Maharashtra : महाराष्ट्रात गेल्या चार ते पाच दिवसांपासून हवामानात मोठा बदल झाला आहे. राज्यातील विविध भागांमध्ये ढगाळ हवामान तयार झाले आहे. यामुळे राज्यातील थंडीची तीव्रता कमी झाली आहे.
विशेष म्हणजे काही जिल्ह्यांमध्ये गेल्या दोन दिवसांपासून अवकाळी पावसाची हजेरी देखील लागत आहे. काही ठिकाणी चांगला मुसळधार पाऊस पडत आहे. तर कुठे गुलाबी थंडीची चाहूल देखील लागली आहे. एकूणच काय की राज्यात सध्या हिवसाळा सुरू आहे.
अशातच भारतीय हवामान विभागाच्या माध्यमातून आज देखील महाराष्ट्रातील आठ जिल्ह्यांमध्ये जोराचा पाऊस बरसणार असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे यंदा दिवाळीची सुरुवात पावसानेच होणार असे चित्र तयार झाले आहे.
खरंतर आज वसुबारस अर्थातच गोवत्स द्वादशी आज पासून खऱ्या अर्थाने दिवाळीच्या पावन पर्वाला सुरुवात होणार आहे. गाईच्या आणि त्याच्या वासराच्या पूजनाने आजपासून दिवाळी पर्व सुरू होईल. त्यामुळे सर्वत्र आनंदाचे वातावरण पाहायला मिळतं आहे.
अशातच हवामान विभागाच्या माध्यमातून एक नवीन हवामान अंदाज समोर आला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज 9 नोव्हेंबर 2023 रोजी राज्यातील कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील दक्षिण भागात पावसाची शक्यता आहे.
या पार्श्वभूमीवर संबंधित विभागातील नागरिकांनी सावध राहणे अपेक्षित आहे. पावसाचा अंदाज बांधूनच नागरिकांनी घराबाहेर पडावे असे आवाहन जाणकार लोकांनी केले आहे. दरम्यान या अवकाळी पावसाचा खरीप हंगामातील काढणीसाठी तयार असलेल्या पिकांना आणि सध्या स्थितीला काढण्यासाठी तयार झालेल्या झेंडू या फुल पिकाला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.
पण हा पाऊस ज्या शेतकऱ्यांनी खरीपात कोरडवाहू भागात पेरणी केली असेल अशा पिकांसाठी फायदेशीर ठरू शकतो. तसेच रब्बी हंगामातील पिकांसाठीही हा पाऊस फायदेशीर ठरणार असल्याचा दावा केला जात आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात सध्या अवकाळी पावसासाठी पोषक हवामान तयार झाले आहे.
अरबी मध्य समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाला असल्याने याचा परिणाम म्हणून आज राज्यात जोरदार वारे, विजांसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. IMD नुसार, आज पुणे, रायगड, सोलापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सातारा या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे.
आज या जिल्ह्यांमध्ये जोरदार वारे देखील होऊ शकतात असा अंदाज आहे. एकूणच काय की या भागात आज वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामुळे संबंधित भागातील नागरिकांनी अधिक सावध राहणे आवश्यक आहे.