Havaman Andaj July 2024 : जुलै महिन्याला नुकतीच सुरुवात झाली आहे. गेल्या महिन्यात महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये मोसमी पावसाचा लपंडाव पाहायला मिळाला. राज्यातील कोकण आणि घाटमाथा या भागात निश्चितच चांगला जोरदार पाऊस झाला. परंतु उर्वरित भागांमध्ये पावसाचे प्रमाण हे खूपच कमी होते.
दक्षिण भारताचा अपवाद वगळता राज्यातील जवळपास सर्वच राज्यांमध्ये जून महिन्यात पावसाचे प्रमाण कमी पाहायला मिळाले. जून महिन्यात देशातील बहुतांशी भागात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला.
यामुळे साहजिकच देशभरातील शेतकरी बांधव चिंतेत सापडले आहे. महाराष्ट्रात जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस झाला. तर कोकण आणि घाटमाथ्यावर जोरदार पावसात हजेरी लागली.
यामुळे या संबंधित भागातील खरीप हंगामातील पिकांना नवीन संजीवनी मिळाली आहे. पण राज्यात आजही जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे. यामुळे जुलै महिन्यात पाऊसमान कसे राहणार ? हा मोठा प्रश्न शेतकऱ्यांच्या माध्यमातून उपस्थित केला जात आहे.
दरम्यान, याच संदर्भात भारतीय हवामान खात्याने मोठी माहिती दिली आहे. हवामान खात्याने म्हटल्याप्रमाणे, जुलै महिन्यात महाराष्ट्र सहित संपूर्ण देशभरात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडणार आहे.
जुलै महिन्यात सरासरीच्या 106% एवढा पाऊस पडणार आहे. या चालू महिन्यात राज्यातील कोकण किनारपट्टी आणि मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये चांगल्या जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
उत्तर महाराष्ट्रात मात्र कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या तुलनेत काहीसा कमी पाऊस पाहायला मिळू शकतो. राज्यात पुढील दोन दिवस कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज देण्यात आला आहे.
दुसरीकडे जुलैमध्ये पावसासोबतच तापमान देखील महाराष्ट्रासहित संपूर्ण देशभरात सरासरीपेक्षा जास्ती राहणार असे म्हटले जात आहे. एकंदरीत जुलै महिन्यात जून महिन्यापेक्षा अधिकचा पाऊस पडणार असा अंदाज हवामान खात्याने जारी केला आहे.
गेल्या महिन्यात राज्यात सरासरी पेक्षा कमी पाऊस झाला आहे आणि यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. आता, मात्र जुलैमध्ये महाराष्ट्रात चांगला पाऊस पडेल आणि यामुळे निश्चितच शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.