Havaman Andaj : यावर्षी मान्सून महाराष्ट्रात वेळे आधीच आला. यामुळे शेतकऱ्यांसहित साऱ्या जनतेच्या आशा पल्लवीत झाल्या. यंदा गेल्यावर्षी सारखी परिस्थिती राहणार नाही हे स्पष्ट झाले. पावसाळा सुरू होण्याआधीच हवामान खात्याने यंदा चांगला मानसून राहणार असा अंदाज दिलाच होता. दरम्यान, मान्सूनचे राज्याच्या मुख्य भूमीत वेळेआधी आगमन झाल्यानंतर हा अंदाज खरा ठरणार हे नक्की झाले.
मात्र, विदर्भासाठी मान्सून आत्तापर्यंत समाधानकारक राहिला नाही ही देखील गोष्ट येथे अधोरेखित करण्यासारखी आहे. विदर्भात यावर्षी मान्सूनचे आगमन थोडेसे उशिराने झाले आहे.
नागपूरात या वर्षी तब्बल आठ दिवस उशिराने मानसून आगमन झाले आहे. विशेष बाब म्हणजे नागपुरात मान्सून दाखल होऊनहीं अद्याप जिल्ह्यात मुसळधार पाऊस झालेला नाही.
यामुळे नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे. अखेर जिल्ह्यात जोरदार पावसाला कधीपासून सुरुवात होणार हा देखील मोठा प्रश्न येथील शेतकऱ्यांच्या माध्यमातून उपस्थित केला जात आहे.
विशेष म्हणजे या संदर्भात आता भारतीय हवामान खात्याने देखील मोठी माहिती दिली आहे. आय एम डी ने सांगितल्याप्रमाणे सध्या तरी नागपुर जिल्ह्यात मुसळधार पावसासाठी अनुकूल वातावरण पाहायला मिळत नाहीये.
म्हणजे अजून काही दिवस नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मुसळधार पावसाची वाटच पहावी लागणार आहे. नागपूर जिल्ह्यात तब्बल 15 जुलै पर्यंत मुसळधार पावसासाठी पोषक परिस्थिती तयार होणार नाही असे हवामान खात्याचे म्हणणे आहे.
मात्र 15 जुलै नंतर मुसळधार पावसाला सुरुवात होणार असे म्हटले जात आहे. बंगालच्या उपसागरात पावसासाठी स्ट्रॉंग सिस्टम तयार होत नाहीये. याचा परिणाम म्हणून नागपूर सहित विदर्भात पावसाचा जोर वाढत नाहीये.
नागपूर प्रादेशिक हवामान केंद्राच्या शास्त्रज्ञांनी म्हटल्याप्रमाणे 12 ते 15 जुलै पर्यंत मात्र अशी परिस्थिती तयार होणार आहे की नागपूर जिल्हा सहित विदर्भात पावसाचा जोर वाढेल.
बंगालच्या उपसागरात परिसंचरण प्रणाली विकसित झाल्यानंतर नागपूरसहित मध्य भारतात जोरदार पाऊस पडणार आहे. परंतु स्थानिक हवामान तयार होऊन जिल्ह्यात काही ठिकाणी रिमझिम पाऊस पडण्याची शक्यता आहे.
पुढील काही दिवस अशीच परिस्थिती राहणार आहे. जोरदार वाऱ्यासह हलका पाऊस पुढील काही दिवस नागपूर जिल्ह्यात पाहायला मिळणार आहे. मात्र मुसळधार पावसासाठी 15 जुलै पर्यंत वाट पहावी लागेल.