Havaman Andaj : महाराष्ट्रातील सर्वसामान्य नागरिकांसाठी तसेच शेतकऱ्यांसाठी एक मोठी अपडेट समोर आली आहे. ही अपडेट आहे अवकाळी पावसासंदर्भात. खरंतर, दिवाळीचा सण अवघ्या चार दिवसांवर येऊन ठेपला आहे.
नऊ नोव्हेंबर पासून यावर्षी दिवाळीच्या सणाला सुरुवात होणार आहे. गोवतच द्वादशी अर्थातच वसुबारस या दिवसापासून दिवाळीच्या सणाला सुरुवात होईल आणि भाऊबीज सणापर्यंत दिवाळी सेलिब्रेट केले जाईल. यंदा 15 नोव्हेंबरला भाऊबीज आहे.
म्हणजेच 9 नोव्हेंबर ते 15 नोव्हेंबर दरम्यान यावर्षी दिवाळीचा पर्व राहणार आहे. दरम्यान, यावर्षी दिवाळीच्या काळात मुंबई सह संपूर्ण महाराष्ट्रातील कसा हवामान राहणार या कालावधीत अवकाळी पावसाचे लावेल का? याबाबत हवामान अंदाज वर्तवणाऱ्या वेगरीज ऑफ वेदर संस्थेने मोठी माहिती दिली आहे.
वेगरीज ऑफ वेदर संस्थेने दिलेल्या माहितीनुसार सध्या राज्यातील बहुतांशी भागात कमाल तापमान हे 35 अंश सेल्सिअस पर्यंत कायम आहे. किमान तापमान मात्र 15 अंश सेल्सिअस पर्यंत खाली आले आहे.
विशेष म्हणजे नुकत्याच काही दिवसांपूर्वी जळगाव जिल्ह्यात सर्वाधिक कमी किमान तापमानाची नोंद करण्यात आली होती. जळगाव मध्ये किमान तापमान मात्र 11° सेल्सिअस पर्यंत खाली आले होते.
पण भारतीय हवामान खात्याने यावर्षीच्या नोव्हेंबर महिन्यात महाराष्ट्रातील कमाल आणि किमान तापमान नेहमीपेक्षा एक ते दोन अंश सेल्सिअस अधिक राहू शकते, असे सांगितले आहे. म्हणजे नेहमीच्या तुलनेत यंदा नोव्हेंबर महिन्यात थंडीची तीव्रता थोडीशी कमी भासू शकते असं मत हवामान खात्याने वर्तवल आहे.
विशेष बाब म्हणजे हवामान खात्याने आज आणि उद्या राज्यातील कोकणातील आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागात हलका पाऊस पडण्याची देखील शक्यता वर्तवली आहे. आता आपण वेगरीज ऑफ वेदर संस्थेचा अंदाज पाहूया.
वेगरीज ऑफ वेदर संस्थेचा अंदाज काय?
या संस्थेने म्हटल्याप्रमाणे सध्या महाराष्ट्रातील हवामान स्थिर पाहायला मिळत आहे पण या आठवड्याच्या शेवटी राज्यातील हवामानात मोठा बदल होण्याची शक्यता आहे. येत्या आठवड्याच्या शेवटी दक्षिण महाराष्ट्रातील काही ठिकाणी पावसाची शक्यता या संस्थेच्या माध्यमातून वर्तवण्यात आली आहे.
संस्थेने असे निरीक्षण नोंदवले आहे की सध्या दक्षिण भारतात पाऊस सुरू असल्याने याचा परिणाम आपल्या महाराष्ट्रावर देखील होण्याची शक्यता आहे. दक्षिण भारतात सुरू असलेल्या पावसामुळे दक्षिण महाराष्ट्रातही पावसासाठी पोषक परिस्थिती तयार होईल.
आणि राजधानी मुंबईसह राज्यातील काही भागात विशेषतः दक्षिण महाराष्ट्रातील काही भागात पावसाची हजेरी लागेल असा अंदाज या संस्थेने वर्तवला आहे. या आठवड्याच्या शेवटी अर्थातच दिवाळी सुरू होण्याच्या गडबडीतच पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.