Havaman Andaj : शेतकऱ्यांसहित राज्यातील सर्वसामान्य जनतेसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ही बातमी आहे परतीच्या पावसा संदर्भात. खरंतर भारतीय हवामान खात्याने पाच ऑक्टोबर पासून महाराष्ट्रात परतीचा पाऊस सुरू झाला असल्याची घोषणा केली आहे. तसेच 10 ऑक्टोबर पर्यंत महाराष्ट्रातून मान्सून माघारी परतणार असे म्हटले आहे.
तसेच परतीचा पाऊस खोळंबला तर जास्तीत जास्त 15 ऑक्टोबर पर्यंत मान्सून माघारी फिरण्यास वेळ लागेल असे स्पष्ट केले आहे. अशातच मात्र भारतीय हवामान खात्याचा एक नवीन अंदाज समोर आला आहे.
हवामान खात्याने 9 ऑक्टोबर पासून महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार असे स्पष्ट केले आहे. आधी काही तज्ञांच्या माध्यमातून 12 ऑक्टोबर पासूनच महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार असे सांगितले गेले होते.
मात्र भारतीय हवामान खात्यातील काही तज्ञांनी आता नऊ ऑक्टोबर पासूनच महाराष्ट्रात पावसासाठी पोषक परिस्थिती तयार होत असल्याचा अंदाज दिला आहे.
हवामान खात्यातील तज्ञांनी सांगितल्याप्रमाणे नऊ ऑक्टोबर पासून ते 11 ऑक्टोबर पर्यंत राज्यातील जवळपास सर्वच भागांमध्ये तुरळक ठिकाणी विजा व मेघगर्जना सह किरकोळ पावसाची शक्यता आहे. म्हणजेच पावसाचा जोर या काळात कमी राहणार आहे.
मात्र असे असले तरी राज्यातील सिंधुदुर्ग सातारा सांगली कोल्हापूर व मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर धाराशिव लातूर बीड परभणी जालना हिंगोली नांदेड या एकूण 13 जिल्ह्यांमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.
एवढेच नाही तर भारतीय हवामान खात्यातील तज्ञांनी ऑक्टोबरच्या दुसऱ्या पंधरवड्यात म्हणजेच 15 ऑक्टोबर पासून ते 31 ऑक्टोबर पर्यंतच्या काळातही पाऊस बरसणार असा अंदाज दिला आहे.
कोजागिरी पौर्णिमा ते नरक चतुर्दशी या काळात संपूर्ण महाराष्ट्रात मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. म्हणजेच 15 ते 31 ऑक्टोबर दरम्यान राज्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार अशी शक्यता जाणवत आहे.