Havaman Andaj : पावसाळा संपल्यानंतर आता आपण सारेजन थंडीची वाट पाहत आहोत. दिवाळी उलटून आता बराच काळ झाला आहे. मात्र तरीही महाराष्ट्रसहित देशातील अनेक भागांमध्ये थंडीची प्रतीक्षाचा आहे.
राज्यातील अनेक भागांमध्ये आता तापमान हळूहळू कमी होऊ लागले आहे, परंतु थंडीची तीव्रता काही वाढत नाहीये. दुसरीकडे देशातील काही भागात अजूनही मुसळधार पाऊस सुरू आहे.
तमिळनाडू, केरळ, आंध्र प्रदेश या तीन राज्यांमध्ये पावसाचा हाहाकार सुरु आहे. दरम्यान, भारतीय हवामान खात्याने पुढील पाच दिवस मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.
एवढेच नाही तर भारतीय हवामान खात्याने देशातील नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, तामिळनाडू, पुद्दुचेरी, केरळ, माहे या भागातही मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. यासोबतच या भागात वादळाचाही इशाराही देण्यात आला आहे.
आज 7 नोव्हेंबर रोजी अंदमान आणि निकोबार या भागात पावसाची शक्यता आहे. दुसरीकडे आजपासून १२ नोव्हेंबर पर्यंत तामिळनाडू, पुडुचेरी, कराईकल या भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
शिवाय, 8 ते 10 नोव्हेंबर दरम्यान, केरळ, माहे या भागात पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. तसेच, 9 आणि 10 नोव्हेंबर रोजी किनारी आंध्र प्रदेश, यानाम आणि रायलसीमा येथे पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
मणिपूरमध्ये तर येत्या काही तासात गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासांत पश्चिम मध्य प्रदेश, रायलसीमा, तामिळनाडू, पुद्दुचेरी, कराईकल, केरळ आणि माहे येथे किमान तापमानात एक ते दोन अंश सेल्सिअसची घसरण नोंदवण्यात आली आहे.
पंजाब, हरियाणा, राजस्थान, गुजरात, उत्तर मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, गंगेच्या पश्चिम बंगालमध्ये किमान तापमान सरासरीपेक्षा दोन ते चार अंश सेल्सिअसने जास्त आहे. पण आता पुढील आठवडाभर तरी उत्तर भारतात तापमानात मोठा बदल होणार नाही,
तर मध्य आणि दक्षिण भारतात तापमानात दोन ते तीन अंश सेल्सिअसने वाढ होईल. याशिवाय, गेल्या २४ तासांत दिल्ली/एनसीआरमध्ये तापमानात किंचित घट नोंदवण्यात आली आहे. दिल्लीत किमान तापमान 14-18 अंशांच्या दरम्यान आहे,
तर कमाल तापमान 30-33 अंश सेल्सिअसच्या दरम्यान नोंदवले गेले आहे. महाराष्ट्र बाबत बोलायचं झालं तर महाराष्ट्रातील हवामान पुढील पाच दिवस तरी कोरडे राहणार आहे. तसेच आता राज्यात हळूहळू थंडीची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे.
राज्यातील अनेक भागांमध्ये थंडीची चाहूल लागली आहे. मात्र थंडीची तीव्रता अजूनही म्हणावी तशी पाहायला मिळत नाही. पण लवकरच याची तीव्रता वाढेल असे बोलले जात आहे. यामुळे शेती पिकांना नक्कीच मोठा दिलासा मिळणार आणि शेती पिकांची वाढ चांगली जोरदार होईल असे म्हटले जात आहे.