Havaman Andaj : राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून पुन्हा एकदा जोरदार पाऊस सुरु झाला आहे. राज्यातील मध्य महाराष्ट्र, कोकण आणि विदर्भात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. विदर्भातील नागपूर आणि अमरावती जिल्ह्यात काही ठिकाणी अक्षरशा अतिवृष्टी सारखा पाऊस झाला आहे.
यामुळे तेथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. दरम्यान भारतीय हवामान खात्याने आजपासून पुढील चार दिवस राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पुन्हा एकदा मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे.
दरम्यान, आता आपण भारतीय हवामान खात्याचा हा सुधारित हवामान अंदाज अगदी थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. राज्यातील कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये भारतीय हवामान खात्याने पावसाची शक्यता वर्तवली आहे या विषयात आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत.
कुठे बरसणार जोरदार पाऊस ?
भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, आज विदर्भातील विदर्भातील भंडारा, गोंदिया, दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, उत्तर कोकणातील पालघर, मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, पुणे या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर या सर्व जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
दुसरीकडे विदर्भातील उर्वरित जिल्ह्यांमध्येही जोरदार पावसाचा येल्लो अलर्ट देण्यात आला आहे. तसेच दक्षिण कोकणातील रायगड आणि मध्य महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात काही ठिकाणी अतिजोरदार पावसाची शक्यता लक्षात घेता रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
याशिवाय, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्येही हवामान खात्याने जोरदार पावसाचा अंदाज दिला आहे. उद्या देखील महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये अगदी अतिवृष्टीसारख्या पावसाची शक्यता आहे.
उद्या रत्नागिरी आणि सातारा या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. याशिवाय, उद्या दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग रायगड आणि मध्य महाराष्ट्रातील पुणे, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
तसेच उद्या विदर्भातील सर्वच्या सर्व 11 जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. उत्तर महाराष्ट्रातही काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. या अनुषंगाने उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे.
मराठवाड्यातही काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होणार असा अंदाज आहे. याशिवाय बुधवारी, गुरुवारी आणि शुक्रवारी सुद्धा महाराष्ट्रात कमी अधिक प्रमाणात पावसाची शक्यता आहे.
तथापि बुधवारपासून राज्यातील मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमधून पावसाचा जोर काहीसा कमी होणार आहे. मात्र विदर्भात जोरदार पावसाचा अंदाज आहे. निश्चितच या पावसामुळे ज्या ठिकाणी अजून जोरदार पाऊस झालेला नाही तेथील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.