Havaman Andaj : येत्या काही दिवसात मान्सूनचे आगमन होणार आहे. शेतकऱ्यांसहित उष्णतेने हैरान झालेल्या जनतेचे मान्सून कडे लक्ष आहे. लवकरात लवकर मान्सूनचे आगमन व्हावे आणि उष्णतेपासून दिलासा मिळावा अशी नागरिकांची इच्छा आहे. दरम्यान भारतीय हवामान तज्ञांनी यावर्षी वेळेआधी मान्सून आगमन होऊ शकते असा अंदाज व्यक्त केला आहे. आय एम डी ने म्हटल्याप्रमाणे सध्या प्रचंड उष्णता जाणवत असून याचा परिणाम म्हणून समुद्रातील पाण्याचे वेगाने बाष्पीभवन होत आहे.
यामुळे समुद्रावर हवेचा दाब वाढत चालला आहे. सध्या समुद्रावर 850 हेक्टो पास्कल एवढा हवेचा दाब नमूद केला जात असून जेव्हा हा ताप 1000 हेक्टो पास्कल वर पोहोचेल तेव्हा मान्सून निर्मितीला सुरुवात होणार आहे.
सध्याची परिस्थिती पाहता मात्र लवकरच मान्सून निर्मितीला सुरुवात होईल आणि मान्सूनचे वेळे आधीच भारतात आगमन होईल अशी शक्यता व्यक्त होत आहे.
मात्र, मान्सून आगमनापूर्वी महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये तापमानाचा पारा नवीन विक्रम प्रस्थापित करत आहे. राज्यातील काही भागांमध्ये तापमान 44 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचले आहे.
मुंबई सहित कोकणात उष्णतेची लाट पाहायला मिळत आहे. आज देखील मुंबईसह कोकणात उष्णतेची लाट येणार अशी शक्यता IMD ने व्यक्त केली आहे. आज मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात देखील उष्णतेची लाट येणार असा अंदाज आहे.
आज चार मे रोजी राज्यातील मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, अहमदनगर, पुणे, सोलापूर, औरंगाबाद, जालना आणि नांदेड या भागांमध्ये उष्णतेची तीव्रता अधिक पाहायला मिळणार आहे. या पार्श्वभूमीवर सदर भागातील नागरिकांना सावध राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
देशातील या भागांमध्ये उष्णतेची लाट येणार
महाराष्ट्रासहित देशातील अनेक राज्यांमध्ये उष्णतेची लाट येण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. आज पश्चिम बंगाल, तामिळनाडू, बिहार, ओडिशा, तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि रायलसीमाच्या काही भागात उष्णतेची लाट येऊ शकते.
उद्या देखील देशातील विविध भागांमध्ये उष्णतेची लाट पसरू शकते. उद्या पश्चिम बंगाल, बिहार, झारखंड, ओडिशा, मराठवाडा, सौराष्ट्र आणि कच्छ, गुजरात, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि अंतर्गत कर्नाटक या भागात उष्णतेची लाट येणार असा अंदाज आयएमडीने व्यक्त केला आहे.
काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता
देशाच्या काही राज्यांमध्ये उष्णतेची लाट आली आहे तर काही ठिकाणी अजूनही वादळी पावसाची शक्यता आहे. आसाम, मेघालंय, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरामध्ये उद्या आणि परवा मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.
तसेच अरुणाचल प्रदेश मध्ये उद्या अर्थातच 5 मे रोजी मुसळधार ते अति मुसळधार स्वरूपाचा पाऊस होणार असा अंदाज आहे. यामुळे या सदर भागातील शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे नुकसान होऊ शकते अशी भीती व्यक्त होत आहे.