Havaman Andaj December : राज्यातील हवामानात सातत्याने बदल होत आहे. गेल्या तीन ते चार दिवसांपासून राज्यात अवकाळी पावसाचा जोर काहीसा कमी झाल्याचे पाहायला मिळाले आहे.
पण, अजूनही राज्यातून पूर्णपणे अवकाळी पावसाचे सावट नाहीसे झालेले नाही. गेल्या महिन्यात अरबी समुद्रात तयार झालेल्या चक्रीवादळामुळे राज्यात मुसळधार पाऊस झाला.
राज्यातील उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा विदर्भ आणि कोकणात पावसाची हजेरी पाहायला मिळाली. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांनी अगदी तळहाताच्या फोडाप्रमाणे जोपासलेले शेती पिक वाया गेले.
यामुळे शेतकरी बांधवांच्या माध्यमातून अवकाळी पाऊस केव्हा विश्रांती घेणार, कडाक्याच्या थंडीला केव्हा सुरुवात होणार हा सवाल उपस्थित केला जात आहे. दरम्यान भारतीय हवामान विभागाने याबाबत सविस्तर अपडेट दिली आहे.
आय एम डी ने दिलेल्या माहितीनुसार राज्यात आज अर्थातच सहा डिसेंबर 2023 रोजी मराठवाडा आणि कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे.
या पार्श्वभूमीवर संबंधित भागातील शेतकऱ्यांनी आपल्या शेती पिकांची आणि पशुधनाची काळजी घ्यावे असे आवाहन करण्यात आले आहे. पावसाला पोषक हवामान झाल्याने आज पूर्व विदर्भात जोरदार वारे व विजांसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
तसेच मराठवाड्यात सुद्धा तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान खात्याच्या माध्यमातून यावेळी वर्तवण्यात आला आहे.
कोणत्या जिल्ह्यात पडणार पाऊस?
IMD ने वर्तवलेल्या आपल्या सुधारित हवामान अंदाजानुसार आज विदर्भ, मराठवाड्यात पावसाला पोषक हवामान तयार झाले आहे. आज विदर्भातील भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यात ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वारे वाहून विजांसह पाऊस हजेरी लावणार असे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.
म्हणजेच आज या तीन जिल्ह्यात वादळी पावसाची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर या तिन्ही जिल्ह्यांना ‘येलो अलर्ट’ देण्यात आला आहे.
तसेच मराठवाडा विभागातील नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यात देखील आज विजांसह पावसाची शक्यता वर्यवण्यात आली आहे. या जिल्ह्यांसाठी मात्र कोणताच अलर्ट जारी करण्यात आलेला नाही.