Havaman Andaj : शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी बातमी समोर येत आहे. खरे तर राज्यात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाचे सावट पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे मध्यंतरी राज्यात काही ठिकाणी गारपीट देखील झाली आहे. राज्यातील विदर्भ आणि खानदेश मधील काही जिल्ह्यात गारपीट झाल्याची नोंद करण्यात आली आहे.
दरम्यान भारतीय हवामान खात्याने पुन्हा एकदा महाराष्ट्रात अवकाळी पावसाची आणि गारपीटीची शक्यता वर्तवली आहे. यामुळे राज्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढू लागली आहे. जसं की आपणास ठाऊकच आहे की खरीप हंगामात पावसाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांना अपेक्षित असे उत्पादन मिळालेले नाहीये.
मान्सूनचे उशिराने आगमन झाले होते यामुळे अनेकांना खरीप हंगामातून चांगली कमाई झालेली नाहीये. हेच कारण आहे की राज्यातील बहुतांशी शेतकऱ्यांचा संपूर्ण मदार रब्बी हंगामावर पाहायला मिळत आहे.
दरम्यान रब्बी हंगामावर आता अवकाळी पावसाचे आणि गारपिटीचे सावट तयार झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. अगदी तळ हाताच्या फोडाप्रमाणे जोपासलेले शेती पिक गारपिटीमुळे वाया गेले आहे.
दरम्यान हवामान खात्याने राज्यात आज अर्थातच दोन मार्चला अवकाळी पाऊस आणि गारपिटीची हजेरी लागणार असा अंदाज व्यक्त केला आहे. आज राज्यातील जवळपास 14 जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
यातील काही जिल्ह्यांमध्ये गारपीट होणार असा अंदाज आहे. आयएमडीने दिलेल्या माहितीनुसार, उत्तर केरळपासून ते कोकणापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा निवळून गेला आहे.
मात्र असे असले तरीही सध्या राज्याच्या विविध भागात ढगाळ हवामान होत आहे. विशेष म्हणजे काही ठिकाणी सायंकाळनंतर पाऊस पडत आहे. वादळी स्वरूपाचा पाऊस होत असल्याने अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
आज देखील राज्यातील उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात वादळी पाऊस आणि गारपिटीचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. दुसरीकडे, कोकणातही तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
आयएमडीने आज राज्यातील धुळे, बीड, हिंगोली, नांदेड, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया या दहा जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाचा इशारा दिला असून या पार्श्वभूमीवर यासंबंधीत जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
तसेच आज जळगाव, संभाजीनगर, जालना, परभणी या 4 जिल्ह्यात गारपिटीचा इशारा देण्यात आला असून संबंधित जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट देण्यात आला आहे.