Havaman Andaj : जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पावसाने उसंत घेतली होती. मात्र तदनंतर पावसाचा जोर वाढला. मात्र ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात राज्यात चांगला जोरदार पाऊस झाला. परंतु गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील पावसाचा जोर थोडासा कमी झाला आहे.
तथापि आज राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम पावसाची नोंद करण्यात आली आहे. अशातच भारतीय हवामान खात्याने पुढील पाच दिवस महाराष्ट्राचे हवामान कसे राहणार याबाबत मोठी माहिती दिली आहे.
आज भारतीय हवामान खात्याने राज्यातील मुंबईसह पालघर वगळता संपूर्ण कोकण, संपूर्ण खानदेश, मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवली आहे.
तसेच विदर्भातील बुलढाणा, वाशिम, यवतमाळ हे जिल्हे वगळता उर्वरित जिल्ह्यात आज पावसाची शक्यता आहे. पण उर्वरित राज्यात मात्र पावसाची उघडीप राहणार असा अंदाज आहे.
तसेच उद्यापासून सोमवार पर्यंत विदर्भ वगळता महाराष्ट्रातील उर्वरित भागात पाऊस विश्रांती घेणार असे हवामान खात्याने आपल्या नवीन बुलेटिन मध्ये स्पष्ट केले आहे.
आय एम डी ने सांगितल्याप्रमाणे उद्या अर्थातच 10 ऑगस्ट पासून ते 13 ऑगस्टपर्यंत नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम, अमरावती या विदर्भातील सर्वच्या सर्व 11 जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे.
या पार्श्वभूमीवर या जिल्ह्यांना येल्लो अलर्ट जारी करण्यात आला आहे. मात्र उर्वरित महाराष्ट्रात पावसाची उघडीप राहणार असा अंदाज देण्यात आला आहे.
दुसरीकडे ज्येष्ठ हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी आज आणि उद्या महाराष्ट्रात पावसाची शक्यता वर्तवली असून 11 ते 19 ऑगस्ट दरम्यान महाराष्ट्रात बहुतांशी जिल्ह्यात पावसाची उघडीप राहणार असे म्हटले जात आहे.