Havaman Andaj : गेल्या तीन ते चार दिवसांपासून राज्यातील काही भागात पावसाला सुरुवात झाली आहे. मान्सून अंशतः सक्रिय झाला असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. खरंतर मान्सून सुरू होऊन तीन महिन्यांचा काळ उलटला आहे. जून ते सप्टेंबर हा चार महिन्यांचा काळ मान्सूनचा असतो. यापैकी जून ते ऑगस्ट हा तीन महिन्यांचा काळ उलटला आहे.
मात्र या तीन महिन्यांपैकी जून आणि ऑगस्ट महिन्यात खूपच कमी पाऊस पडला आहे. या दोन्ही महिन्यात राज्यात सरासरी एवढा पाऊस झालेला नाही. सरासरीपेक्षा खूपच कमी पावसाची नोंद या दोन महिन्यात करण्यात आली. गेल्या ऑगस्ट महिन्यात तर फक्त 40 टक्के पावसाची नोंद करण्यात आली आहे. यामुळे खरीप हंगामातील पिके करपण्याच्या अवस्थेत आहेत.
काही भागात विहिरींच्या पाण्याच्या पातळीतही मोठी घट पाहायला मिळाली आहे. शिवाय राज्यातील प्रमुख धरणे अजूनही 100% भरलेली नाहीत. यामुळे या मान्सूनच्या शेवटच्या महिन्यात चांगला पाऊस पडला नाही तर आगामी काळात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर येण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. विशेष बाब म्हणजे गुराढोरांच्या चाऱ्याचा प्रश्न देखील उभा राहणार होता.
यामुळे सर्वत्र चिंता व्यक्त केली जात होती. मात्र आता पुन्हा एकदा राज्यात पावसाला सुरुवात झाली आहे. आजपासून पुढील पाच दिवस राज्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. वास्तविक, गेल्या तीन ते चार दिवसांपासून राज्यातील काही भागात पाऊस पडत आहे मात्र अजूनही राज्यात असे काही भाग आहेत जिथे पाऊस झालेला नाही.
यामुळे तेथील शेतकऱ्यांना आणि सामान्य जनतेला अजूनही पावसाची प्रतीक्षा आहे. पण आजपासून भारतीय हवामान विभागाने पुन्हा एकदा पाऊस सक्रिय होणार अशी माहिती दिली आहे. हवामान विभागाने सांगितल्याप्रमाणे, पुढील पाच दिवस राज्यातील काही भागात जोरदार पावसाची हजेरी लागणार आहे.
विदर्भात मात्र पुढील तीन दिवस जोरदार पाऊस पडणार अशी शक्यता आहे. आज 5 सप्टेंबर आणि उद्या 6 सप्टेंबर रोजी विदर्भातील काही जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. IMD ने दिलेल्या माहितीनुसार, उत्तर बंगालच्या उपसागरात चक्राकार वारे तयार होत आहेत याच्या प्रभावामुळे मंगळवार पर्यंत बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार होणार आहे.
यामुळे राज्यात आगामी पाच दिवस पाऊस पडणार असा अंदाज आहे. पुण्यात मात्र पुढील सहा ते सात दिवस पावसाची आता वर्तवण्यात आली असून पुण्यातील घाटमाथ्यावर आगामी दोन दिवसांसाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.