Havaman Andaj : ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात पावसाने विश्रांती घेतली होती. पण सप्टेंबर महिना सुरू झाला आणि पावसाने आपले खरे रंग रूप दाखवले. सप्टेंबरच्या पहिल्या तीन दिवसांमध्ये अर्थातच एक ते तीन सप्टेंबर दरम्यान राज्यातील उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र विभागात जोरदार पाऊस झाला.
या विभागातील काही जिल्ह्यांमध्ये अक्षरशः अतिवृष्टी सारखा पाऊस झाला. मराठवाड्यातील परभणी व लगतच्या भागात पावसाचा जोर सर्वाधिक पाहायला मिळाला. मात्र तीन तारखे नंतर पावसाचा जोर कमी झाला. आता, गेल्या काही दिवसांपासून रजेवर असणारा पाऊस पुन्हा एकदा सक्रिय झाला आहे.
हवामान खात्यातील तज्ञांनी सांगितल्याप्रमाणे बंगालच्या उपसागरात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र आता आणखी तीव्र बनले आहे. याचा परिणाम म्हणून पुन्हा एकदा महाराष्ट्रात पावसासाठी पोषक परिस्थिती तयार झाली आहे.
यामुळे गेल्या दोन दिवसांमध्ये राज्यातील विविध भागांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला आहे. दरम्यान भारतीय हवामान खात्याने आज सुद्धा राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे.
आय एम डी ने सांगितल्याप्रमाणे आज मध्य महाराष्ट्रातील घाटमाथा परिसर, कोकण आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे.
या अनुषंगाने या सदर जिल्ह्यांना भारतीय हवामान खात्याकडून अलर्ट जारी करण्यात आला आहे. आज राज्यातील तब्बल 27 जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे. उर्वरित राज्यात मात्र पावसाची प्रामुख्याने विश्रांती राहणार आहे.
तरीही काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता नाकारून चालणार नसल्याचा अंदाज आयएमडी कडून समोर आला आहे. आता आपण राज्यातील कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे या संदर्भात माहिती पाहूया.
कोणत्या जिल्ह्यात बरसणार मुसळधार पाऊस?
भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई वगळता कोकणातील सर्वच्या सर्व पाच जिल्ह्यांमध्ये, मध्य महाराष्ट्रातील नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूर, विदर्भातील गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. या अनुषंगाने या संबंधित जिल्ह्यांना जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे.
तसेच विदर्भातील उर्वरित जिल्ह्यांमध्ये, खानदेशातील जळगांव, धुळे, मराठवाड्यातील नांदेड, हिंगोली, परभणी, जालना, छत्रपती संभाजी नगर या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटा सह पावसाची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर या सदर जिल्ह्यांना सुद्धा येलो अलर्ट जारी झाला आहे.