Havaman Andaj : गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्राचे देशातील शेतकरी बांधव वेगवेगळ्या नैसर्गिक संकटांमुळे अडचणीत आले आहेत. अवकाळी, अतिवृष्टी, ढगाळ हवामान, गारपीट, दुष्काळ यांसारख्या नानाविध संकटांमुळे शेतीचा व्यवसाय मोठा आव्हानात्मक बनला आहे.
नैसर्गिक संकटांमुळे शेतीमधून शेतकऱ्यांना अपेक्षित असे उत्पादन मिळत नाहीये. गेल्या वर्षाच्या शेवटी देखील महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यांवर अवकाळी पावसाचे सावट पाहायाला मिळाले आहे.
नोव्हेंबर-डिसेंबर 2023 मध्ये ढगाळ हवामान आणि अवकाळी पाऊस झाला होता.परिणामी रब्बी हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले. सेंबरच्या दुसऱ्या आठवड्यानंतर मात्र राज्यात थंडीचा जोर वाढू लागला होता.
यामुळे आता रब्बी हंगामातील पिके चांगली जोमाने वाढतील आणि बऱ्यापैकी उत्पादन मिळेल असे शेतकऱ्यांना वाटत होते. मात्र असे काही घडले नाही नवीन वर्षाची सुरुवात देखील अवकाळी पावसाने झाली.
2024 ची सुरुवात अवकाळी पावसाने झाल्यामुळे रब्बी हंगामातील पिकांना पुन्हा एकदा फटका बसला आहे.विशेष म्हणजे अजूनही महाराष्ट्रात अवकाळी पावसाची शक्यता कायम आहे.
स्कायमेट या खाजगी हवामान अंदाज वर्तवणाऱ्या संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रासहित देशातील 31 जिल्ह्यांमध्ये आगामी काही दिवस अवकाळी पाऊस बरसणार असा अंदाज आहे.
स्कायमेट ने सांगितल्याप्रमाणे, आज आणि उद्या महाराष्ट्रातील कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. मात्र राज्यातील तापमानात घट होणार असा देखील अंदाज आहे.
म्हणजेच थंडीचाही जोर वाढणार आहे. महाराष्ट्रासह उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान आणि अरुणाचल प्रदेश या राज्यातही पावसाचा अंदाज देण्यात आला आहे.
मध्य प्रदेशातील खरगोन, खंडवा, झाबुआ, इंदूर, धार, बुरहानपूर, बरवानी, अलीराजपूर, नीमच, मंदसौर या 10 जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. याशिवाय एमपी मधील काही जिल्ह्यांमध्ये गारपिट होईल असा देखील अंदाज आहे.
एकंदरीत आज आणि उद्या महाराष्ट्रातील काही भागात अवकाळी पावसाचा अंदाज असल्याने संबंधित भागातील शेतकऱ्यांना आपल्या शेती पिकांची आणि चाऱ्याची विशेष काळजी घ्यावी लागणार आहे.