Havaman Andaj : महाराष्ट्रातील हवामानात सध्या मोठा बदल पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून जोरदार बरसणारा पाऊस आता विश्रांती घेत आहे. राज्यातील बहुतांश विभागातून मान्सून माघारी फिरला आहे. याचा परिणाम म्हणून राज्यात दुपारी कडक ऊन पडत आहे तर रात्री थंडीची तीव्रता देखील पाहायला मिळत आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत राज्याच्या 45 टक्के भागांमधून मान्सून माघारी फिरला आहे. विशेष म्हणजे येत्या एक ते दोन दिवसात संपूर्ण महाराष्ट्रातून मान्सून माघारी फिरणार आहे.
महाराष्ट्राचा दक्षिण आणि मध्य भाग वगळता अन्य भागातूनही मान्सून साधारण 10 ऑक्टोबरपर्यंत परतेल, असा अंदाज हवामान विभागाच्या माध्यमातून यावेळी वर्तवण्यात आला आहे. आय एम डी ने दिलेल्या माहितीनुसार, सध्या महाराष्ट्रातील बहुतांशी भागात दुपारी तापमानाचा पारा वाढत आहे तर रात्री तीव्र थंडी पडू लागली आहे.
दरम्यान, पुढील 24 तासात राज्यातील दक्षिण महाराष्ट्र, गोवा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या ठिकाणी हलका पाऊस पडणार असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. उर्वरित महाराष्ट्रात मात्र पावसाची उघडीप राहणार आहे.
उर्वरित महाराष्ट्रामध्ये काही भागात ढगाळ हवामान पाहायला मिळू शकते, परंतु कुठेच पाऊस होणार नसल्याचे सांगितले गेले आहे. म्हणजेच उर्वरित महाराष्ट्रात प्रामुख्याने हवामान कोरडे आणि आकाश निरभ्र राहणार आहे.
या राज्यात होणार मुसळधार पाऊस
महाराष्ट्रात आता फारशा मोठ्या पावसाची शक्यता नाहीये. पण हवामान खात्याने देशातील इतर राज्यांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. IMD ने दिलेल्या माहितीनुसार, तामिळनाडूमध्ये ८ ते ११ ऑक्टोबरला, दक्षिण आतील कर्नाटकात ९ आणि १० ऑक्टोबरला, केरळमध्ये १० आणि ११ ऑक्टोबरला मुसळधार पाऊस पडेल.
रविवारी म्हणजेच आज दक्षिण कर्नाटक, तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि कराईकलमध्ये विविध ठिकाणी विजांच्या कडकडाटासह, मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे.
9 ऑक्टोबर रोजी जम्मू-काश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेश, उप-हिमालयीन पश्चिम बंगाल आणि सिक्कीम, दक्षिण अंतर्गत कर्नाटक आणि तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि कराईकलमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.