Havaman Andaj : महाराष्ट्रात श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या शुभमुहूर्तावर पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झाली आहे. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून राज्यात भाग बदलत जोरदार पाऊस पडत आहे. मध्य महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ आणि कोकणात जोरदार पावसाची हजेरी लागली आहे. काल मध्य महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात तर काही ठिकाणी अतिवृष्टी सारखा पाऊस झाला आहे.
काही भागात अक्षरशः पूरस्थिती निर्माण झाली आहे. मात्र यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढत नसून चिंता मिटत आहे. कारण की जून आणि ऑगस्ट या तीन महिन्यांपैकी फक्त जुलै महिन्यातच जोरदार पाऊस झाला आहे. जून महिन्यात खूपच कमी पाऊस झाला होता. ऑगस्ट महिन्यात तर पाउसचं नव्हता. संपूर्ण ऑगस्ट महिना कोरडा गेला होता.
त्यामुळे खरीप हंगामातील पिके संकटात सापडलीत. दरम्यान आता गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर वाढला असल्याने ऑगस्ट महिन्याची पावसाची तूट सप्टेंबर महिन्यातून भरून निघेल अशी शेतकऱ्यांची आशा आहे. यामुळे आता ऑगस्ट महिन्याची पावसाची तूट सप्टेंबर महिन्यातून भरून निघते का? हे विशेष पाहण्यासारखे राहणार आहे.
अशातच भारतीय हवामान विभागाने आगामी काही दिवस राज्यात पावसाची शक्यता वर्तवली आहे. हवामान विभागाने नऊ ते बारा सप्टेंबर दरम्यान राज्यात कसा हवामान राहणार याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. आय एम डी ने सांगितल्याप्रमाणे पुढील दोन दिवस राज्यात पावसाची शक्यता आहे.
कोकण विभागातील ठाणे रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना हवामान विभागाने दोन दिवसासाठी येलो अलर्ट जारी केला आहे. तसेच उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यासाठी 9 सप्टेंबरला येलो अलर्ट आणि दहा सप्टेंबरला ग्रीन अलर्ट देण्यात आला आहे. आज ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि पालघर जिल्ह्यातील काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
मुंबईमध्ये मात्र 9 ते 12 सप्टेंबर दरम्यान हलका ते मध्यम पाऊस पडणार आहे. या कालावधीसाठी राजधानी मुंबईमध्ये ग्रीन अलर्ट राहणार आहे. तसेच 11 आणि 12 सप्टेंबर रोजी ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.