Havaman Andaj : गेल्या चार-पाच दिवसांपासून महाराष्ट्रात मुसळधार पाऊस होत आहे. भारतीय हवामान खात्याने आज सुद्धा राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. मुसळधार पावसामुळे राज्यातील अनेक भागांमध्ये सर्वसामान्य जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक भागांमध्ये शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे नुकसान झाले आहे.
गेल्या दोन-तीन दिवसांमध्ये मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड, अहमदनगर, नाशिक धुळे सह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची तीव्रता वाढली असून याचा परिणाम म्हणून काही ठिकाणी पूरस्थिती तयार झाली आहे. अनेक ठिकाणी महापुरासारखी परिस्थिती तयार झाली असून यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे जीवन विस्कळीत झाल्याचे पाहायला मिळत आहे.
महत्त्वाचे म्हणजे आज राज्यात अनेक भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. उद्यापासून राज्यातील पावसाचा जोर कमी होणार असा अंदाज हवामान खात्याने जारी केला होता. मात्र आता हवामानात पुन्हा एक मोठा बदल पाहायला मिळाला आहे.
म्हणून आता राज्यात पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम राहणार असे आयएमडी ने स्पष्ट केले आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्र आणि गुजरात राज्याला एका चक्रीवादळाचा धोका आहे. चक्रीवादळामुळे या दोन्ही राज्यांमध्ये आगामी काही दिवस मुसळधार पावसाची शक्यता आहे.
मुंबईसह राज्यात आणि गुजरातच्या सीमेवर चक्रीवादळाचा प्रभाव राहणार आहे. या चक्रीवादळाचा प्रभाव हा फक्त या दोन राज्यातच नाही तर देशातील इतरही राज्यांमध्ये पाहायला मिळणार आहे. उत्तर-पश्चिम आणि पश्चिम मध्य बंगालच्या उपसागरात सायक्लॉनिक सर्क्युलेशन तयार झालं आहे.
याचा परिणाम भारतावर आणि आसपासच्या देशांवरही दिसून येईल असे हवामान खात्याने स्पष्ट केले आहे. या वादळाचा प्रभाव म्हणून पश्चिम मध्य बंगालच्या उपसागरावर वाऱ्याचा सरासरी वेग ताशी 30-40 किमी आणि कमाल वेग 55 किमी प्रति तासापेक्षा जास्त दिसू शकतो. कोकण, गोवा, गुजरात आणि महाराष्ट्रासाठी चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर रेड अलर्ट देण्यात आला आहे.
आगामी 48 तास नागरिकांनी समुद्रकिनाऱ्यावर जाऊ नये असे आवाहन जाणकारांनी केले आहे. चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील नागरिकांनी सतर्क रहावे असा सल्ला देण्यात आला आहे. समुद्रकिनाऱ्याजवळ जी गावे आहेत त्या गावातील नागरिकांना दक्षतेचा इशारा जारी करण्यात आला आहे.
देशातील कोणत्या भागात पाऊस पडणार?
राज्यातील उत्तर किनारपट्टी, उत्तर मध्य महाराष्ट्र, दक्षिण गुजरात, बिहार आणि उप-हिमालयीन पश्चिम बंगालमध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो. देशातील सिक्कीम, झारखंड, ओडिशा, छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशच्या काही भागात पावसाचा जोर वाढणार असा अंदाज आहे.
या पार्श्वभूमीवर या सदर भागातील सर्वसामान्य नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी विशेष सावध राहावे. शेतकऱ्यांनी आपल्या शेती पिकांची आणि पशुधनाची काळजी घ्यावी. विनाकारण घराबाहेर पडू नये. समुद्रकिनारा लगत भागात वसलेले नागरिकांनी अधिक दक्ष राहावे. अशा काही सूचना प्रशासनाकडून निर्गमित करण्यात आल्या आहेत.
यासोबतचं ईशान्य भारत, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, किनारी कर्नाटक, अंदमान आणि निकोबार बेटे, लक्षद्वीप, पंजाबचा काही भाग, उत्तर हरियाणा, पूर्व राजस्थान, तामिळनाडू, जम्मू-काश्मीर, गिलगिट-बाल्टिस्तान, मुझफ्फराबाद, लडाख, दिल्ली, पश्चिम गुजरात, केरळ आणि लक्षद्वीपमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मात्र या भागात पावसाची तीव्रता थोडीशी कमी राहणार आहे. तरीही चक्रीवादळाच्या अनुषंगाने या भागातील नागरिकांनी देखील सावध राहावे असा सल्ला यावेळी जाणकारांनी दिला आहे.