Havaman Andaj 2024 : मार्च महिन्याची सुरुवात अवकाळी पावसाने झाली होती. खरे तर जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात देखील अवकाळी पाऊस झाला होता. यानंतर मार्च महिन्याची सुरुवात ही अवकाळी पाऊस आणि गारपिटीने झाली. त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. आता मात्र गेल्या काही दिवसांपासून आपल्या महाराष्ट्रातील हवामान कोरडे आहे.
मार्च महिन्याचा पहिला पंधरवडा जवळपास उलटत आला आहे. त्यामुळे देशातील अनेक राज्यांमध्ये कमाल आणि किमान तापमानात वाढ पाहायला मिळत आहे. देशातील अनेक राज्यांमध्ये उन्हाच्या झळा बसत आहेत. कमाल तापमानात वाढ झाली असल्याने नागरिकांना उकाड्याचा सामना करावा लागत आहे.
आपल्या महाराष्ट्रात सुद्धा तापमान वाढ नमूद केली जात आहे. राज्यातील अनेक भागात दिवसाचे कमाल तापमान 38 ते 40 संशय दरम्यान पोहोचले आहे. एकंदरीत आता उन्हाच्या तीव्र झळा नागरिकांना घामाघुम करून सोडत आहेत. मात्र असे असतानाच देशातील हवामानात पुन्हा एकदा मोठा बदल पाहायला मिळत आहे.
देशातील अनेक राज्यांमध्ये पुन्हा एकदा हवामान खात्याने अवकाळी पावसाचा अंदाज दिला आहे. विशेष म्हणजे काही ठिकाणी गारपीट होऊ शकते असे देखील आयएमडीने यावेळी स्पष्ट केले आहे. आयएमडीने देशातील अकरा राज्यांमध्ये तुफान पाऊस अन गारपीटीची शक्यता वर्तवली आहे.
यामुळे देशातील अनेक भागांमधील शेतकऱ्यांची पुन्हा एकदा चिंता वाढणार आहे. अशा परिस्थितीत, आता आपण भारतीय हवामान विभागाने देशातील कोणत्या राज्यांमध्ये अवकाळी पावसाचा आणि गारपिटीचा अंदाज दिला आहे याविषयी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कुठं बसणार अवकाळी पाऊस ?
आय एम डी ने सांगितल्याप्रमाणे, आज आणि उद्या जम्मू आणि काश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे यातील काही राज्यांमध्ये हिमवर्षाव होईल असा देखील अंदाज देण्यात आला आहे.सोबतच आज पंजाब, हरियाणा, चंदीगड, उत्तर प्रदेश आणि राजस्थानच्या भागात हलक्या पावसाचा अंदाज आयएमडीकडून जरी झाला आहे.
आज आणि उद्या बंगाल आणि सिक्कीम मध्ये देखील पाऊस पडेल असा अंदाज आहे.तसेच पश्चिम बंगाल येथील गंगेच्या प्रदेशात आज पासून 17 मार्च पर्यंत आणि ओडिशामध्ये उद्यापासून 17 मार्चपर्यंत पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. १६ आणि १७ मार्चला झारखंड, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड येथे हलका पाऊस हजेरी लावणार असे आयएमडीने आपल्या नवीन बुलेटिन मध्ये स्पष्ट केले आहे.
ईशान्येकडील राज्यांबाबत बोलायचं झालं तर आजपासून पुढील तीन दिवस आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरामध्ये हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. अरुणाचल प्रदेश मध्ये सुद्धा हलका ते मध्यम पाऊस आणि हिमवृष्टी होण्याचा अंदाज यावेळी देण्यात आला आहे. अशा परिस्थितीत या सदर राज्यांमधील शेतकऱ्यांना विशेष काळजी घ्यावी लागणार आहे.
महाराष्ट्रात कस राहणार हवामान ?
आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे देशातील काही राज्यांमध्ये अवकाळी पावसाची आणि गारपीटीची शक्यता असल्याने आपल्या महाराष्ट्रात हवामान कसे राहणार ? तर आयएमडीने याबाबत देखील आपल्या बुलेटिनमध्ये मोठी अपडेट दिली आहे.
हवामान खात्याने सांगितल्याप्रमाणे, पुढील आठवडाभर महाराष्ट्रातील हवामान प्रामुख्याने कोरडे राहणार आहे. अर्थातच आपल्या महाराष्ट्रात आगामी काही दिवस अवकाळी पावसाची शक्यता नाहीये. शिवाय गारपीटीचा देखील कोणताच अंदाज देण्यात आलेला नाही. यामुळे राज्यातील शेतकऱ्यांनी चिंता करण्याचे काहीही कारण नाही.