Havaman Andaj 2024 : मध्यंतरी राज्यात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू होता. यामुळे जोरदार पाऊस कधी बरसणार हा सवाल शेतकरी बांधवांच्या माध्यमातून उपस्थित केला जात होता. खरे तर जूनमध्ये राज्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला. जुलैच्या पहिल्या आठवड्यात देखील पावसाचा जोर फारच कमी पाहायला मिळाला. जुलैच्या पहिल्या आठवड्यात राज्यातील जवळपास सर्वचं जिल्ह्यांमध्ये पावसाची उघडीप होती.
फक्त तुरळक ठिकाणी किरकोळ पाऊस पडत होता. मात्र, आता गेल्या दोन-तीन दिवसांपासून वारे फिरले आहे. वातावरणात अचानक मोठा बदल झाला आहे. राज्यातील काही भागांमध्ये आता मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडत आहे. यामुळे मुसळधार पावसाची वाट पाहणाऱ्या बळीराजाला मोठा दिलासा मिळाला आहे.
आय एम डी ने सांगितल्याप्रमाणे, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून यामुळे सध्या कोकण आणि घाटमाथा परिसरावर चांगला जोरदार पाऊस होत आहे. तसेच उर्वरित राज्यात हलका ते मध्यम पाऊस सुरु आहे.
एकंदरीत महाराष्ट्रात सर्वदूर पाऊस सुरू आहे. काही ठिकाणी मुसळधार पाऊस होत आहे तर काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस सुरू आहे. दरम्यान भारतीय हवामान खात्याने आज देखील राज्यातील जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये पाऊस हजेरी लावणार असा अंदाज दिला आहे.
आज राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 33 जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. म्हणजे राज्यातील तीन जिल्हे वगळता जवळपास सर्वदूर पाऊस पडणार आहे. यातील कोकण आणि घाटमाथा परिसरातील जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
विशेष म्हणजे उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम विदर्भात देखील जोरदार पावसाचा अंदाज आहे. उर्वरित राज्यात मात्र विजांच्या कडकडाटासह पाऊस हजेरी लावणार असे आयएमडीने यावेळी स्पष्ट केले आहे.
या पार्श्वभूमीवर भारतीय हवामान खात्याने राज्यातील काही जिल्ह्यांना रेड, काही जिल्ह्यांना ऑरेंज तर काही जिल्ह्यांना येल्लो अलर्ट जारी केला आहे. दरम्यान आता आपण कोंकण, घाटमाथा, उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम विदर्भातील कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कुठं बरसणार पाऊस ?
आज मुंबईसह संपूर्ण कोकणात जोरदार पावसाची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्याला रेड अलर्ट देण्यात आला आहे आणि कोकणातील उर्वरित जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांना देखील ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
या जिल्ह्याच्या घाटमाथा सेक्शनवर मुसळधार पावसाचा अंदाज आहे. तसेच, नाशिकसह संपूर्ण खानदेश अन विदर्भातील बुलढाणा, अकोला, वाशिम या जिल्ह्यांसाठी जोरदार पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
विदर्भातील उर्वरित जिल्ह्यांमध्ये, मराठवाड्यातील सर्वच्या सर्व आठ जिल्ह्यांमध्ये अन उत्तर महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. या अनुषंगाने या जिल्ह्यांना देखील येलो अलर्ट देण्यात आला आहे.