Havaman Andaj 2024 : नवीन वर्षाचा आज दुसरा दिवस. मात्र या नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच राज्यासह देशातील हवामान अर्थ अमुलाग्र बदल होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. वास्तविक गेल्या काही दिवसांपासून राज्यातील गारठा काहीसा कमी झाला आहे.
काल राज्यातील काही भागात थोडीशी थंडी वाढली होती मात्र तरीही डिसेंबर 2023 महिन्यातील दुसऱ्या पंधरवड्याच्या सुरवातीच्या थंडीशी तुलना केली असता अजूनही थंडीचा जोर काहीसा कमीच भासत आहे.
याचे कारण म्हणजे राज्यातील किमान तापमानात किंचित वाढ झाली आहे. अशातच आता भारतीय हवामान विभागाच्या माध्यमातून महाराष्ट्रात पुढील पाच दिवस कसे हवामान राहणार ? या संदर्भात एक अतिशय महत्त्वाचे आणि मोठे अपडेट समोर आले आहे.
हवामान खात्याने महाराष्ट्रात आगामी पाच दिवस ढगाळ हवामानाची आणि किरकोळ स्वरूपाच्या हलक्या पावसाची शक्यता वर्तवली आहे.
आता आपण राज्यातील कोणत्या जिल्ह्यात अवकाळी पाऊस हजेरी लावणार याविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
खरे तर, नोव्हेंबर 2023 महिन्याची एंडिंग अवकाळी पावसाने झाली. यानंतर डिसेंबरची सुरुवात सुद्धा अवकाळी पावसाने झाली.
डिसेंबर महिन्याच्या अखेरीस अवकाळी पाऊस बरसणार होता मात्र हवामानात बदल झाला आणि जोरदार थंड वारे महाराष्ट्राच्या दिशेने वाहू लागले आहेत, यामुळे राज्यात थंडीचा जोर वाढला होता.
आता मात्र पुन्हा एकदा हवामानात चेंज आला आहे. हवामान खात्याने महाराष्ट्रात सात जानेवारीपर्यंत ढगाळ हवामानाची आणि अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील काही जिल्ह्यात अवकाळी पाऊस आणि ढगाळ हवामानाची शक्यता आहे.
कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील सर्व 17 जिल्ह्यांमध्ये आणि विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि वर्धा या 5 जिल्ह्यांमध्ये 7 जानेवारी 2024 पर्यंत ढगाळ हवामानाची आणि या जिल्ह्यांच्या काही ठिकाणी अगदी किरकोळ स्वरूपाच्या हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.