Havaman Andaj 2024 : गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील हवामानात सातत्याने बदल होत आहेत. ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला राज्यात तापमानात वाढ झाली होती. ऑक्टोबर हिट मुळे नागरिक घामाघुम होत होते. मात्र, गत दोन दिवसांपासून महाराष्ट्रात पुन्हा एकदा पाऊस सक्रिय झाला आहे.
त्यामुळे राज्यातील दिवसाचे कमाल तापमान हे सातत्याने घसरत असून आता उकाड्याने हैरान जनतेला मोठा दिलासा मिळत आहे. अशातच भारतीय हवामान खात्याने पावसा संदर्भात एक मोठी माहिती दिली आहे.
हवामान खात्याने आपल्या नवीन अंदाजात कोजागिरी पर्यंत पावसाचा मुक्काम कायम राहणार असे म्हटले आहे. म्हणजेच 15 ऑक्टोबर पर्यंत महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे. परतीचा पाऊस अजूनही नंदुरबार जिल्ह्यातच रखडलेला आहे.
परतीच्या पावसाचा प्रवास तेथून पुढे सुरूच होत नाहीये. त्यामुळे परतीच्या पावसाबाबत भारतीय हवामान खात्याकडून कोणतीच माहिती हाती आलेली नाही. हवामान खात्यातील तज्ञांनी महाराष्ट्रातील परतीच्या पावसाबाबत जेव्हा त्याचा पुढील प्रवास सुरू होईल तेव्हाच योग्य तो अंदाज बांधता येईल असे म्हटले जात आहे.
दुसरीकडे हवामान खात्याने आज अर्थातच दसऱ्याच्या दिवशी महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. गेल्या काही दिवसांपासून नवरात्र उत्सवाची धूम होती. आज याच नवरात्र उत्सवाचा सांगता होणार आहे.
नवरात्र उत्सवाच्या सांगत्याला विजयादशमी अर्थातच दसऱ्याचा सण साजरा होत असतो. यंदाही दसऱ्याचा सण मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. मात्र यंदा दसऱ्याला महाराष्ट्रात तुफान पावसाची शक्यता आहे.
भारतीय हवामान खात्याने जारी केलेल्या अंदाजानुसार, आज राज्यातील मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पालघर तसेच रायगड जिल्ह्यांममध्ये वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर या संबंधित जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.
आज दक्षिण कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातही तुफान पावसाची शक्यता देण्यात आली आहे. पावसाची शक्यता लक्षात घेता या सदर जिल्ह्यांना देखील यलो अलर्ट देण्यात आला आहे.
याशिवाय, आज मराठवाडा विभागातील जालना, बीड विदर्भातील बुलडाणा, अकोला, वाशीम, अमरावती, वर्धा, यवतमाळ या भागात तुफान पावसाची शक्यता आहे. नंदूरबार, धुळे, सातारा, कोल्हापूरमध्येही आज पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
या भागात ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस होणार आहे. उर्वरित भागात ढगाळ वातावरण राहणार असून उन्हाचा चटका वाढण्याची शक्यता मात्र कायमचं आहे. एकंदरीत राज्यातील काही भागात पावसाळी वातावरण राहणार आहे तर काही भागात उकाडा वाढण्याची शक्यता आहे.